अहेरीत सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन
By admin | Published: January 6, 2017 01:42 AM2017-01-06T01:42:24+5:302017-01-06T01:42:24+5:30
सहा हजार रूपये मानधन देण्यात यावे या मुख्य मागणीसाठी अहेरी नगर पंचायती अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांनी गुरूवारी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले.
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : १५ वर्षांपासून मागण्या प्रलंबित
अहेरी : सहा हजार रूपये मानधन देण्यात यावे या मुख्य मागणीसाठी अहेरी नगर पंचायती अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांनी गुरूवारी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले. त्यामुळे अहेरी येथे स्वच्छतेचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते.
या आंदोलनादरम्यान सफाई कामगारांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन दिले. निवेदनात मागील १५ ते २० वर्षांपासून ग्रामपंचायत असताना आपण नाली उसपण्याचे काम करीत आहोत. वाढलेल्या महागाईच्या तुलनेत अत्यंत कमी मजुरी आपल्याला दिली जाते. त्यामुळे मासिक सहा हजार रूपये मानधन देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात सुनिता बाबुराव राऊत, रूख्माबाई मधुकर वाघाडे, रंजूबाई शंकर वाघाडे, सिंधूबाई वाघाडे, संगीता राऊत, ललिता राऊत, अरूण राऊत, सुरेश राऊत, शंकर वाघाडे, मधुकर वाघाडे, बाना मिद्दमवार यांनी सहभाग घेतला. (शहर प्रतिनिधी)