मजुरांची उपासमार; रोहयो बनतेय 'उधार' योजना, मजुरी मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:14 IST2025-01-16T15:10:13+5:302025-01-16T15:14:24+5:30
Gadchiroli : सिंचन विहिरींच्या अनुदानासाठी प्रतीक्षाच; गावात कामे मिळूनही मजुरांची परजिल्ह्यात मिरची तोडणीच्या कामासाठी धाव

Laborers are starving; this scheme is being implemented but wages are not being received
दिलीप दहेलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करूनही मजुरांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा न झाल्याने मजूर बँकेत व पंचायत समिती कार्यालयात चकरा मारून थकले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील १ लाख २४ हजार मजुरांची कोट्यवधी रुपयांची मजुरी थकली आहे.
सप्टेंबर २०२४ पासून आतापर्यंत म्हणजे १० जानेवारी २०२५ पर्यंत केलेल्या कामाचे पैसे मजुरांच्या खात्यात जमा न झाल्याने शासनाची ही योजना उधारीवरील योजना बनत चालली आहे. ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर थांबावे व हातांना काम देण्याबरोबरच या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वैयक्तिक लाभ देण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे केली जातात.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांचे गोठे, फळबाग, शेळी शेड, कुक्कुटपालन शेड, शेततळे, नाडेप खत, गांडूळखत, वैयक्तिक शौचालय, सिंचन विहीर अशा १४ प्रकारच्या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. मात्र गेल्या दीड वर्षांपासून या कामांचे पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही.
६० : ४० चे प्रमाण नाही
राहेयो कायद्यान्वये कुशल कामे ४० टक्के, तर अकुशल कामाचे प्रमाण ६० टक्के ठेवणे आवश्यक आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेकडून कामांमध्ये ६०:४० प्रमाण ठेवले जात नसल्याचे दिसून येते.
१९ कोटी रस्ता, नाली कामाची बिले निघतात लवकर
३७ लाख रुपयांची रोहयो कामाची मजुरी गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित असल्याने मजूर संकटात सापडले आहेत.
तालुका मजूर संख्या मजुरीची रक्कम
अहेरी ३९२७ ७२७५७०८
आरमोरी ११६०५ १७३७६७९३
भामरागड २९९८ ५१२८२६५
चामोर्शी १४८३२ २४२२३०४०
देसाईगंज १८३५२ २२३९९३१६
धानोरा १९२७३ ३०७२४५३५
एटापल्ली ३७१९ ६८१८६०३
गडचिराली १६३६८ २४८१५३०४
कोरची ९९५२ १५९५४६९८
कुरखेडा १६१५५ २५०११९५०
मुलचेरा ४७०६ ८१७९२२८
सिरोंचा २९०० ५७४४४६६
एकुण १२४७८७ १९३७२१९०६