आरमाेरी शहरातील वाढीव वस्तीत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:37 AM2021-04-01T04:37:03+5:302021-04-01T04:37:03+5:30

आरमाेरी : नगर पंचायतीचे नगर परिषदेेमध्ये रूपांतर झाल्यानंतरही आरमाेरी शहरात शहरवासीयांच्या अपेक्षेेप्रमाणे विकासाची गंगा दिसून येत नाही. विकास कामात ...

Lack of amenities in the overcrowded city of Armari | आरमाेरी शहरातील वाढीव वस्तीत सुविधांचा अभाव

आरमाेरी शहरातील वाढीव वस्तीत सुविधांचा अभाव

Next

आरमाेरी : नगर पंचायतीचे नगर परिषदेेमध्ये रूपांतर झाल्यानंतरही आरमाेरी शहरात शहरवासीयांच्या अपेक्षेेप्रमाणे विकासाची गंगा दिसून येत नाही. विकास कामात गती नसून वाढीव वस्ती तसेच शहरापासून दूरवर असलेला परिसर अद्यापही दुर्लक्षित आहे.

काळागाेटा परिसरासह वाढीव वस्तीत रस्ते, नाल्या, छाेटे पूल, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर मूलभूत समस्या अजूनही कायम आहेत. नगर परिषद प्रशासनाच्या वतीने विकास कामे हाती घेण्यात आली असून ही कामे विकसित भागात हाेत असल्याचा काही नागरिकांचा आराेप आहे. न.प.प्रशासनाने शहराचा समताेल विकास साधावा, ज्या ठिकाणी रस्ते, नाल्यांची गरज आहे. शहरवासीयांच्या मागणीनुसार प्रशासनाने विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शहरावासीयांकडून हाेत आहे. याकडे मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे नागरिकांच्या वतीने वेळाेवेळी यासंदर्भात मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच हाेत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Lack of amenities in the overcrowded city of Armari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.