काेटापल्लीत मूलभूत साेईसुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:36 AM2021-03-21T04:36:02+5:302021-03-21T04:36:02+5:30
ग्रामीण भागात किती प्रमाणात विकास झाला. याची वास्तविकता दुर्गम गावात गेल्यानंतर दृष्टीस पडते. अविकसित व मागासलेपणाचा ठपका या ...
ग्रामीण भागात किती प्रमाणात विकास झाला. याची वास्तविकता दुर्गम गावात गेल्यानंतर दृष्टीस पडते. अविकसित व मागासलेपणाचा ठपका या भागाला लागला आहे. कोटापल्ली गावात अजूनपर्यंत शासनाच्या सोयीसुविधा पोहोचल्या नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने शिवाय लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले. शासन व प्रशासन लोकप्रतिनिधींनी गावाच्या विकासाकडे तोंड फिरविल्याने हाक कुणाला द्यावी, असा प्रश्न कोटापल्ली ग्रामस्थांना पडला आहे. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षानंतरही गावात पक्के रस्ते, सिमेंट काँक्रीट नाल्या, विहिरी तसेच नळ योजना यासह अन्य विकासकामे न झाल्याने गावकऱ्यांना आहे तसेच जीवन जगावे लागत आहे. येथे नळ योजना नसल्याने हातपंपाच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागते. उन्हाळ्यात जलस्त्रोताची पातळी खालावते. त्यामुळे पाण्यासाठीही भटकंती होते. नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नळ योजना कार्यान्वित होणे आवश्यक आहे. तसेच दळणवळणाची साधने उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी कोटापल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.