नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या आशांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:35 AM2021-01-03T04:35:57+5:302021-01-03T04:35:57+5:30

गडचिराेली : ग्रामीण भागात आराेग्य सेेवेचे काम करणाऱ्या उत्कृष्ट आशा स्वयंसेविकांचा आशा दिनानिमित्त शुक्रवार १ जानेवारीला गाैरव करण्यात आला. ...

Lack of hope for innovative work | नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या आशांचा गाैरव

नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या आशांचा गाैरव

Next

गडचिराेली : ग्रामीण भागात आराेग्य सेेवेचे काम करणाऱ्या उत्कृष्ट आशा स्वयंसेविकांचा आशा दिनानिमित्त शुक्रवार १ जानेवारीला गाैरव करण्यात आला.

तालुका आराेग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने गडचिराेली येथे आशा दिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ.शशिकांत शंभरकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा आराेग्य अधिकारी तथा तालुका आराेग्य अधिकारी डाॅ.सुनील मडावी हाेते. अतिथी म्हणून सहायक जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ.विनाेद म्हशाखेत्री, वैद्यकीय अधिकारी डाॅ.विनाेद बिटपल्लीवार, जिल्हा समूह संघटक धीरज सेलाेटे उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविकांची हिमाेग्लाेबिन, रक्तदाब, कर्कराेग, मुखराेग, सिकलसेल, मधुमेह, थाॅयराईड, रॅट तपासणी करण्यात आली.

आशांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून रांगाेळी, कविता वाचन व पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. यात सहभागी झालेल्यांना प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन गाैरविण्यात आले. जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ.शशिकांत शंभरकर यांनी आशा स्वयंसेविकांच्या कामाचे काैतुक करून पुन्हा नव्या जाेमाने काम करण्याबाबत मार्गदर्शन केले. तर डाॅ.सुनील मडावी यांनी जिल्ह्यातील मातामृत्यू, बालमृत्यू कमी करण्यासाठी आशा स्वयंसेविका देत असलेल्या याेगदानाची प्रशंसा केली. डाॅ.म्हशाखेत्री यांनी आशांची कामे व जबाबदाऱ्या सांगितल्या. आशा आराेग्य सहायक काेटरंगे यांनीही आशा स्वयंसेविकांच्या कामात येणाऱ्या अडचणी कशाप्रकारे दूर करता येईल, याबाबत सांगितले. संचालन गटप्रवर्तक जयमाला साेरते, प्रास्ताविक तालुका समन्वयक संघटक नरेंद्र म्हशाखेत्री तर आभार तालुका लेखापाल विजय रामटेके यांनी मानले. यशस्वीतेसाठी आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक व आराेग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

बाॅक्स...

यांचा झाला सत्कार

गडचिराेली तालुक्याच्या ग्रामीण भागात उत्कृष्ट आराेग्य सेवा देणाऱ्या तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या आशांना तालुकास्तरावर दाेन व प्राथमिक आराेग्यस्तरावर एक पारिताेषिक देण्यात आले. आशा कार्यक्रमाच्या चाैकटीत जाऊन नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या दाेन आशा स्वयंसेविकांना प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन गाैरविण्यात आले.

Web Title: Lack of hope for innovative work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.