अंतिम टप्प्यातील राेवणीच्या कामांचा पावसाअभावी खाेळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 05:00 AM2021-08-09T05:00:00+5:302021-08-09T05:00:42+5:30
गडचिराेली जिल्ह्यात मुख्य पीक धानाचे आहे. धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने राेवणीची कामे सुरू हाेण्यास विलंब झाला हाेता. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा हाेती. अशाच शेतकऱ्यांनी धान राेवणीला सुरुवात केली हाेती. मात्र, त्यानंतर बऱ्यापैकी पाऊस झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी राेवणीच्या कामाला सुरुवात केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : महिनाभरापूर्वी सुरू झालेली धान राेवणीची कामे अंतिम टप्प्यात पाेहाेचली आहे. फार कमी शेतकऱ्यांची धान राेवणी शिल्लक आहेत. तीही राेवणी दाेन ते तीन दिवसांत आटाेपणार आहेत.
गडचिराेली जिल्ह्यात मुख्य पीक धानाचे आहे. धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने राेवणीची कामे सुरू हाेण्यास विलंब झाला हाेता. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा हाेती. अशाच शेतकऱ्यांनी धान राेवणीला सुरुवात केली हाेती. मात्र, त्यानंतर बऱ्यापैकी पाऊस झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी राेवणीच्या कामाला सुरुवात केली. आता राेवणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काही शेतकरी कमी कालावधीच्या धानाची लागवड करतात. या धानाच्या राेवणीचा कालावधी निघून गेल्याने आता या शेतकऱ्यांनी धानाची राेवणीच केली नाही.
यावर्षी काही शेतकऱ्यांनी धानाच्या पेरणीचा प्रयाेग केला. हा प्रयाेग यशस्वी झाल्यास शेतकरी धानाच्या राेवणीऐवजी पेरणी करण्याकडे वळण्याची शक्यता आहे. धान राेवणीसाठी माेठ्या प्रमाणात खर्च हाेते. त्याला पेरणी हा पयार्य हाेऊ शकताे. सध्या प्रायाेगिक तत्वावर हा उपक्रम राबविला जात आहे. त्यातून उत्पादन किती हाेते, हे बघण्याची गरज आहे.
आठ दिवसांपासून पाऊस बेपत्ता
मागील आठ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. दिवसा कडक ऊन निघत असल्याने प्रचंड उकाडा हाेत आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपूनही जिल्ह्यातील जलसाठे अर्धेच भरले आहेत.
शेतकरी माेठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे. कारण सप्टेंबर महिन्यापर्यंत धानाला पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे जलसाठे भरलेली असणे आवश्यक आहे. जलसाठे अर्धेच भरले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.
राेवणी लांबल्यास उत्पन्न घटते
धानाचे पऱ्हे टाकल्यापासून एक महिन्याच्या आत धानाची राेवणी हाेणे आवश्यक आहे. मात्र आता दाेन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. त्यामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट हाेण्याचा अंदाज आहे.