आरमाेरीतील काेविड सेंटरकडे लाेकप्रतिनिधींची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:27 AM2021-06-01T04:27:34+5:302021-06-01T04:27:34+5:30
देशातील अनेक घटनांचे पडसाद आरमोरीत उमटत असताना कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर राजकीय नेत्यांच्या मुलाकडून हल्ला होतो त्यावर कोणीही राजकीय ...
देशातील अनेक घटनांचे पडसाद आरमोरीत उमटत असताना कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर राजकीय नेत्यांच्या मुलाकडून हल्ला होतो त्यावर कोणीही राजकीय पदाधिकारी बोलले नाही. डॉ. मारबते यांना मारहाणप्रकरणी खासदार व आमदारांनी कोविड केअर सेंटरमधे येऊन माहिती घेत वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे होते, असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र त्यांनी या विषयाला बगल दिली.
याबाबत डॉ. मारबते यांची भावना जाणून घेतली असता, आ. कृष्णा गजबे यांनी फाेन करून घटनेची माहिती घेतली व आपल्याला धीर दिला, तसेच घटनेचा निषेधही नाेंदविला, असे त्यांनी सांगितले. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही काेविड सेंटरमध्ये गेलो असता तेव्हाच ही घटना घडली. मारहाण हाेत असतानाच आम्ही त्यांना साेडविले. तसेच घटनेचा निषेध करून कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन दिले, असे न.प. सभापती भारत बावनथडे यांनी सांगितले.