तलाव माती कामामुळे शेतीला मिळणार मुबलक पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2016 01:27 AM2016-07-01T01:27:06+5:302016-07-01T01:27:06+5:30
तालुक्यातील कुरूड येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वे नं. ५०९ मध्ये मामा तलावाचे माती काम...
मग्रारोहयोची फलश्रुती : १७१ मजुरांनी केले काम
चामोर्शी : तालुक्यातील कुरूड येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वे नं. ५०९ मध्ये मामा तलावाचे माती काम जिल्हा परिषद सिंचन विभाग चामोर्शीकडून सात दिवस करण्यात आले. या माती कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली असून तलावातील गाळ काढण्यात आल्याने आता पाणी क्षमताही वाढली आहे.
मामा तलावाच्या माती कामावर ८१ पुरूष व ९० महिला मजूर असे एकूण १७१ मजूर कामावर होते. माती कामासोबत नाली बांधकाम, धोबी घाटाचे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता साईनाथ दुम्पट्टीवार, ग्राम रोजगार सेवक नंदू मेश्राम, नामदेव बोदलकर यांनी दिली आहे. शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावे व अधिकचा पाणी साठा जमा होऊन राहावा, याकरिता तलावातील गाळ काढणे, पाळीची उंची वाढविणे व रूंदीकरण करणे हे काम करण्यात आले. त्यामुळे जलस्तर वाढण्यास मदत होणार आहे. (शहर प्रतिनिधी)