गतिराेधकाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:08 AM2021-02-06T05:08:49+5:302021-02-06T05:08:49+5:30

आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे ...

Lack of speed limiter | गतिराेधकाचा अभाव

गतिराेधकाचा अभाव

Next

आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून अवजड वाहनांचेही आवागमन असते.

कमलापुरात समस्या

कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयीसुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. परंतु कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पशुधन सांभाळताना पशुपालक त्रस्त

अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गाई व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहेत.

अनेक पांदण रस्ते अतिक्रमणात

जोगीसाखरा : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. जोगीसाखरा परिसरातील पळसगाव, रामपूर, कासवी आदी गावातील पांदण अतिक्रमणात आहेत.

आलापल्लीतील थ्रीजी सेवा कुचकामी

आलापल्ली : आलापल्ली येथे बीएसएनएलच्या वतीने थ्रीजी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र ही थ्रीजी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टूजी सेवेप्रमाणे आहे.

वाहनांचा लिलावच नाही

गडचिरोली : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.

डासांनी मांडला उच्छाद

गडचिरोली : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. सदर ढिगाऱ्यांमुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

पर्यटनस्थळांची वाताहत कायमच

कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध सौंदर्याने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटनस्थळे आहेत. कुरखेडा तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही. या पर्यटनस्थळांचा विकास केल्यास मनोरंजनाचे साधन उपलब्ध होऊ शकते.

वडधात वीज समस्या

आरमोरी : वडधा व देवीपूर परिसरातील वीज पुरवठा मागील काही दिवसापासून वारंवार खंडित होत असल्याने कृषिपंपामार्फत भाजीपाला पिकाला पाणी देण्यास अडचण येत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने येथे नियमित वीज पुरवठा करावा.

वाहनांना आवर घाला

चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बांधण्यात यावेत.

रस्ता बांधकाम करा

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने, नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये अद्यापही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. पावसाळ्यात अनेक रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असते.

एटापल्लीत अतिक्रमण

एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढण्याची गरज आहे. प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.

लघु सिंचन इमारत जीर्ण

अहेरी : येथील उपविभागीय लघु सिंचन जलसंधारण कार्यालयाला शासनाने इमारत बांधून दिली नाही. त्यामुळे या कार्यालयाचा कारभार भाड्याच्या खोलीतूनच चालविला जात आहे. याशिवाय शहरात अनेक शासकीय कार्यालये दुसऱ्या इमारतींमधून चालविले जात आहेत. त्यामुळे अडचण येत आहे.

Web Title: Lack of speed limiter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.