तहसील कार्यालय परिसरात शाैचालयाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:38 AM2021-04-02T04:38:44+5:302021-04-02T04:38:44+5:30
सिरोंचा तालुक्यात ३९ ग्रामपंचायती आहेत. तहसील कार्यालय परिसरात सार्वजनिक शौचालयाचा अभाव आहे. कला, विज्ञान व वाणिज्य पदवीचे महाविद्यालये ...
सिरोंचा तालुक्यात ३९ ग्रामपंचायती आहेत. तहसील कार्यालय परिसरात सार्वजनिक शौचालयाचा अभाव आहे. कला, विज्ञान व वाणिज्य पदवीचे महाविद्यालये आहेत.
दर सोमवारी आठवडी बाजारात भाजीपाला व इतर दुकाने लावण्यासाठी विक्रेते अनेक ठिकाणाहून येतात. महसूल कार्यालयात तलाठी, राजकीय पक्ष कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक आरडा, झिंगानुर, रेगुंठा, बामणी, कोर्ला, पातागुडम, चिटुर, अमडेली, टेकडा मोटला, सोमनपल्ली, गुम्मलकोंडा, गोल्लगुडम, आसमटोला व इतर गावातून दररोज नागरिक कामानिमित्त महसूल कार्यालयात येतात. प्रसाधन गृहाअभावी महिला व पुरुषांची खूप अडचण हाेत आहे. शाळकरी मुले जातीचा दाखला, उत्पन्न दाखले, रेशन कार्ड व इतर दाखल्यांसाठी ५० ते ६० कि.मी. अंतरावरून येतात. त्यांची अडचण हाेऊ नये यासाठी लवकरात लवकर सार्वजानिक शौचालयाचे बांधकाम करावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. प्रभारी तहसीलदार एस.एस.सय्यद यांना विचारले असता तहसील कार्यालय परिसरात पुढच्या महिन्यात नगर पंचायतच्या वतीने सार्वजनिक शौचालय बांधण्यात येईल, असे सांगितले.