तलाव बनले सांडपाण्याचे डबके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:59+5:302021-02-14T04:34:59+5:30
रेगुंठा परिसरात फोर-जी सेवा द्या सिरोंचा: तालुक्यात रेगुंठा परिसरात भ्रमणध्वनी टॉवर नसल्याने, ग्राहकांना तेलंगणा राज्यातील नेटवर्कवर अवलंबून राहावे लागत ...
रेगुंठा परिसरात फोर-जी सेवा द्या
सिरोंचा: तालुक्यात रेगुंठा परिसरात भ्रमणध्वनी टॉवर नसल्याने, ग्राहकांना तेलंगणा राज्यातील नेटवर्कवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे रेगुंठा येथे बीएसएनएलचे टॉवर उभारून फोर-जी सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
डास प्रतिबंधक फवारणी करून मच्छरदानी पुरवा
अंकिसा : सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा, आसरअल्ली परिसरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून डासांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात साथीच्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी या भागात प्रशासनाने डास प्रतिबंधक फवारणी करून नागरिकांना मच्छरदानीचे वाटप करावे.
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार?
धानोरा : सिंचन विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत.
दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस
अहेरी : तालुक्यातील आलापल्लीनजीक असलेल्या नागेपल्ली येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस स्थितीत आहे. लाखो रुपये खर्चून सदर इमारत बांधण्यात आली. मागील १० वर्षांपासून या इमारतीकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या ही इमारत बेवारस आहे.