२० गावातील लाेक काढतात चिखलातूनच वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:43 AM2021-09-24T04:43:06+5:302021-09-24T04:43:06+5:30
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या रेगुंठा परिसरात रेगुंठा, कोटापल्ली, मोयाबिनपेठा, नरसिंहापल्ली, कोत्तूर, येला, मुलादिम्या, बोकटागुडम दार्सेवाडा, पापयापल्ली, ...
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या रेगुंठा परिसरात रेगुंठा, कोटापल्ली, मोयाबिनपेठा, नरसिंहापल्ली, कोत्तूर, येला, मुलादिम्या, बोकटागुडम दार्सेवाडा, पापयापल्ली, पिरमाडा, पर्सेवाडा, चिक्याला, आदींसह एकूण २० गावांचा समावेश आहे. या परिसरातील लोकसंख्या १२ ते १३ हजारांच्या आसपास आहे. या परिसरात पक्क्या रस्त्यांअभावी जंगल, डोंगरदऱ्या व खाचखळग्यांच्या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण विकासाला प्राधान्य देत शासनाने ग्रामीण भागाला दर्जेदार रस्त्याने जोडण्याची याेजना राबविली. या अंतर्गत केंद्र स्तरावरून पंतप्रधान ग्राम सडक योजना व राज्य स्तरावरून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला, मात्र प्रत्यक्षात या निधीचा उपयोग काेणत्या ठिकाणी व कितपत झाला, हा संशोधनाचा विषय आहे.
230921\23gad_1_23092021_30.jpg
पावसामुळे चिखलमय झालेला रेगुंठा परिसरातील एक मार्ग.