वाहनांच्या फॅन्सी नंबरसाठी लाेकांनी उडविले १५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 05:00 AM2021-06-30T05:00:00+5:302021-06-30T05:00:43+5:30

युवावर्गामध्ये वाहनांची खूप क्रेझ आहे. अतिशय महागडे वाहन खरेदी करतात. आपल्या वाहनाला आपल्याला आवडेल असाच क्रमांक मिळावा, यासाठी इच्छुक असतात. अलीकडच्या काळात ही क्रेझ वाढत चालली आहे. गडचिराेलीसारख्या जिल्ह्यातही याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.  

Lakhs flew Rs 15 lakh for fancy vehicle numbers | वाहनांच्या फॅन्सी नंबरसाठी लाेकांनी उडविले १५ लाख

वाहनांच्या फॅन्सी नंबरसाठी लाेकांनी उडविले १५ लाख

Next
ठळक मुद्देकाेराेना काळातही क्रेझ कायम

युवावर्गामध्ये वाहनांची खूप क्रेझ आहे. अतिशय महागडे वाहन खरेदी करतात. आपल्या वाहनाला आपल्याला आवडेल असाच क्रमांक मिळावा, यासाठी इच्छुक असतात. अलीकडच्या काळात ही क्रेझ वाढत चालली आहे. गडचिराेलीसारख्या जिल्ह्यातही याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.  
- रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिराेली

इच्छुक क्रमांक मिळाला तरी ताे कशाही पद्धतीने लिहिता येत नाही. अलीकडे वाहन क्रमांकाची प्लेट आरटीओ विभागामार्फत उपलब्ध करून दिली जाते. हीच प्लेट वापरावी लागते. 
आरटीओ विभागाकडून उपलब्ध झालेली नंबर प्लेट तुटल्यास ज्या शाेरूममधून वाहन खरेदी केले त्या ठिकाणी जाऊन अर्ज करावा. दुसरी नंबर प्लेट उपलब्ध हाेते.

या दाेन नंबर्सना सर्वाधिक मागणी

- ७५० हा क्रमांक आदिवासींचे धार्मिक चिन्ह मानले जाते. त्यामुळे वाहनाच्या एकूण चार क्रमांकात शेवटी ७५० क्रमांक यावा, यासाठी अशा नंबरची सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येते. 
- ९ हा आकडा भाग्यशाली असल्याचा काही नागरिकांचा समज आहे. त्यामुळे आपल्या वाहन क्रमांकाच्या आकड्यांची बेरीज ९ येईल, असा क्रमांक निवडतात.
- तीन किंवा चारही आकडे सारखे असतील अशा क्रमांकाला सर्वाधिक मागणी राहत असल्याने वाहनधारक हजाराे रूपये माेजण्यास तयार असतात. यात वेगवेगळ्या क्रमांकासाठी वेगवेगळे दर आहेत.

फॅन्सी नंबरसाठी असा करावा अर्ज

आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या काेणत्याही नेट कॅफेमध्ये फॅन्सी नंबरबाबतचा अर्ज उपलब्ध आहे. या अर्जात माहिती भरून ताे आरटीओ कार्यालयात सादर करावा लागतो. आरटीओ कार्यालयामार्फत ऑनलाईन  माहिती भरली जाते. आवश्यक असलेला वाहन क्रमांक ऑनलाईन सादर केल्यानंतर त्याची किंमत किती आहे ते उपलब्ध हाेते. त्यानंतर तेवढी रक्कम ई-पेमेंट केल्यानंतर सदर नंबर वाहनधारकाला दिला जातो.

 

Web Title: Lakhs flew Rs 15 lakh for fancy vehicle numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.