चिंतरेवला घाटावर पावणेदाेन लाखांचे सागवान लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:28 AM2021-05-30T04:28:46+5:302021-05-30T04:28:46+5:30

सिराेंचा तालुक्यातील झिंगानूर, बामणी परिसरासह चिंतरेवला भागातून सागवानाची माेठ्या प्रमाणात तस्करी मागील काही दिवसांपासून सुरू आहे. वनविभागाचे अधिकारी व ...

Lakhs of teak wood seized from Chintarev Ghat | चिंतरेवला घाटावर पावणेदाेन लाखांचे सागवान लाकूड जप्त

चिंतरेवला घाटावर पावणेदाेन लाखांचे सागवान लाकूड जप्त

Next

सिराेंचा तालुक्यातील झिंगानूर, बामणी परिसरासह चिंतरेवला भागातून सागवानाची माेठ्या प्रमाणात तस्करी मागील काही दिवसांपासून सुरू आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष देऊन कर्तव्य बजावत आहेत. परंतु रात्रीचा फायदा घेऊन अनेक तस्कर सागवानाची चाेरी करतात. २७ मे राेजी चिंतरेवला घाटावरून सागवानाची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे उपवनसंरक्षक सुमितकुमार, सहायक वनसंरक्षक एस. जी. बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथक व वनपरिक्षेत्र अधिकारी सिरोंचा तसेच कर्मचारी आदींनी चिंतरेवला घाट रस्त्यावर पहाटे सापळा रचून सागाचे १९ नग असा एकूण २. ६१३ घनमीटर माल तसेच ११ बैल, ५ बंड्या एकणू १ लाख ७९ हजार ८६८ रुपयांचे सागवान जप्त केले.

याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस. कातखेडे, एस. एम. कटकू, के.एस. शेख, कारसपल्लीचे क्षेत्रसहायक एल. एम. शेख, वनरक्षक एस. बी. भिमटे, आर. वाय. तंलाडी, राकेश बिस्वास, स्वच्छक रमेश जवाजी, राेजंदारी मजूर सतीश जक्कावार उपस्थित होते.

Web Title: Lakhs of teak wood seized from Chintarev Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.