पॅनकार्डसाठी लाेकांनी केली नाेंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:29 AM2021-01-02T04:29:53+5:302021-01-02T04:29:53+5:30
लाहेरी : उपपोलीस स्टेशन व सीआरपीएफ ३७ बटालियन लाहेरी यांच्या वतीने गावातील पॅनकार्ड नाेंदणी शिबिर घेण्यात आले. या ...
लाहेरी : उपपोलीस स्टेशन व सीआरपीएफ ३७ बटालियन लाहेरी यांच्या वतीने गावातील पॅनकार्ड नाेंदणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात गावातील अनेक लाेकांनी पॅनकार्डसाठी नाेंदणी केली. लाहेरी येथील ग्रामस्थांनी सामूहिक खर्चाने भामरागड ते लाहेरीपर्यंत तार जोडणी करून अतिदुर्गम व नक्षल प्रभावित भागात वायफाय सुरू केले. पुढे अशी जोडणी मल्लमपाेडूर येथे ही करण्यात आली तर होडरी येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून लवकरच वायफाय सेवा उपलब्ध करणार आहेत. या सामूहिक उपक्रमाप्रमाणेच उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी तहसीलदार अनमोल कांबळे यांच्या सहकार्याने परिसरातील नागरिकांसाठी आधार शिबिराचे आयोजन केले. याचा लाभ परिसरातील नागरिकांना झाला. त्यानंतर आता तहसीलदार अनमोल कांबळे व बीएलओ यांच्या मदतीने घरोघरी भेट देऊन त्यांनी नवीन पात्र १९२ मतदारांची नाेंदणी केली. तसेच ऑनलाईन पॅन कार्ड काढण्याबाबत मार्गदर्शन व नोंदणी अभियान २३ ते ३१ डिसेंबर पर्यंत पॅनकार्डसाठी नाेंदणी करण्यात आली.