लक्ष्मीदेवारा : गडचिरोलीच्या आदिवासी भागात द्वापारयुगापासून सुरू असलेली प्रथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:52 PM2018-01-02T13:52:07+5:302018-01-02T13:52:29+5:30
जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात असलेल्या अंगिसा या आदिवासी खेड्यातील आदिवासी बांधव सध्या लक्ष्मीदेवारा या त्यांच्या पारंपारिक सण वा परंपरेला साजरे करण्यात मग्न आहेत.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली: जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात असलेल्या अंगिसा या आदिवासी खेड्यातील आदिवासी बांधव सध्या लक्ष्मीदेवारा या त्यांच्या पारंपारिक सण वा परंपरेला साजरे करण्यात मग्न आहेत. यात गाय किंवा बैलासारखा मुखवटा तोंडावर धारण करून गावातील एखादा व्यक्ती पूर्ण गावात त्याची विधीवत मिरवणूक काढतो. यावेळी त्याने धारण केलेल्या मुखवट्याला लक्ष्मीदेवारा असे संबोधले जाते. ही देवी आपल्यावरील सर्व संकटांचा व रोगराईचा नायनाट करील असा विश्वास आजही येथील आदिवासी समाजात दृढ आहे.
द्वापारयुगापासून ही प्रथा सुरू असून जेव्हा कुठल्याच प्रकारची औषधे उपलब्ध नव्हती तेव्हा याच देवासमोर आदिवासी लोक आपले तक्रारी सांगत व त्या तक्रारीचे निराकरण होत असे. तेव्हापासून हा आदिवासी समाज लक्ष्मीदेवाराची आराधना मोठ्या निष्ठेने करीत आला आहे.