शहरवासीयांना दाखल्यांसाठी भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:46 PM2019-04-29T22:46:41+5:302019-04-29T22:47:03+5:30

नगर परिषद व नगर पंचायतीतून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांसाठीच्या शुल्कात प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ मे पासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी केवळ २० रुपयात मिळणाºया दाखल्यांसाठी आता ४०० ते ५०० रुपये मोजावे लागणार आहेत.

Land Acquisition Board | शहरवासीयांना दाखल्यांसाठी भुर्दंड

शहरवासीयांना दाखल्यांसाठी भुर्दंड

Next
ठळक मुद्दे१ मे पासून अंमलबजावणी : जन्म दाखल्यासाठी ४०० तर मृत्यू दाखल्यासाठी २ हजार रुपये मोजावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नगर परिषद व नगर पंचायतीतून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांसाठीच्या शुल्कात प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ मे पासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी केवळ २० रुपयात मिळणाºया दाखल्यांसाठी आता ४०० ते ५०० रुपये मोजावे लागणार आहेत.
जिल्ह्यातील कर निर्धारक समितीची ४ एप्रिल रोजी बैठक पार पडली. या बैठकीत नगर परिषद, नगर पंचायतींचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. तसेच सर्व नगर पंचायत क्षेत्रात एकच शुल्क आकरण्यात यावे, याबाबतही चर्चा झाली. त्यानुसार शुल्कात वाढ करण्यात आली आहे. शुल्कवाढीबाबत नागरिकांचा काहीही आक्षेप नसता, मात्र जुन्या दराच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यापूर्वी २० रुपयांत मिळणाºया दाखल्यासाठी आता ४०० ते ५०० रुपये आकारले जाणार आहेत.
यापूर्वी गडचिरोली नगर परिषदेत जन्म व मृत्यूचा दाखला केवळ २० रुपयांना मिळत होता. आता जन्म दाखल्यासाठी ४०० रुपये तर मृत्यू दाखल्यासाठी २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. थकबाकी नसल्याचा दाखला ५०० रुपयांना मिळत होता. आता ६०० रुपये झाला आहे. व्यवसाय नाहरकत प्रमाणपत्र ५०० रुपयांना मिळत होता. तो आता ६०० रुपये केला आहे. विवाह नोंदणी दाखला ७०० रुपयांना मिळत होता. तो आता २ हजार रुपये केला आहे. रहिवासी दाखला २० रुपयांना मिळत होता. तो आता ६०० रुपये केला आहे. वीज जोडणीबाबतची एनओसी दाखला ५०० रुपयांना मिळत होता. तो आता ६०० रुपये केला आहे.
अत्यावश्यक दाखल्यांवर वाढले २५ पटीने शुल्क
जन्म, मृत्यू, रहिवासी दाखला हा प्रत्येक नागरिकाला घ्यावाच लागतो. कितीही गरीब असला तरी प्रशासकीय कामासाठी या दाखल्यांची गरज भासते. ही बाब लक्षात घेऊन या तिन्ही दाखल्यांसाठी यापूर्वी केवळ २० रुपये शुल्क आकारले जात होते. नवीन नियमात आता जन्म दाखल्यासाठी ४००, मृत्यू दाखल्यासाठी २ हजार व रहिवासी दाखल्यासाठी ६०० रुपये गडचिरोलीवासीयांना मोजावे लागणार आहेत. हा सर्वसामान्य व गरीब नागरिकांवर लादलेला भुर्दंड आहे. या दाखल्यांचे शुल्क २५ पटीने वाढविले आहे. तर दुसरीकडे विद्युत जोडणी दाखला, व्यवसाय नाहरकत दाखला यांच्या शुल्कात नाममात्र वाढ केली आहे. या दोन्ही दाखल्यांची मागणी करणाºया व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण चांगली राहत असल्याने त्यांच्याकडून अधिकचा शुल्क आकारण्यास काहीच हरकत नाही. मात्र या उलट घडले आहे.

नागरिकांवर आकारलेले दाखल्यांसाठीचे शुल्क अवास्तव व अन्यायकारक आहेत. मृत्यू दाखला एखाद्या गरीब व्यक्तीला आवश्चयक असल्यास तो कुठून २ हजार रुपये आणणार, असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, जन्म, मृत्यू व रहिवासी दाखला यांच्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करावे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून मागणी केली आहे.
- संजय मेश्राम, नगरसेवक नगर परिषद गडचिरोली

Web Title: Land Acquisition Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.