भूसुरुंग पेरणाऱ्या मट्टामीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, भामरागडच्या आरेवाडा जंगलात ठोकल्या बेड्या

By संजय तिपाले | Published: November 25, 2024 08:57 PM2024-11-25T20:57:54+5:302024-11-25T20:58:24+5:30

दरम्यान, यातील एका आरोपीला २४ नोव्हेंबरला पोलिसांनी भामरागडच्या आरेवाडा जंगलातून अटक केली. पांडु कोमटी मट्टामी (३५, रा. पोयारकोटी ता. भामरागड) असे त्या आरोपीचे नाव आहे.

Landmine planting Mattami arrested, shackled in Bhamragarh's Arewada forest | भूसुरुंग पेरणाऱ्या मट्टामीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, भामरागडच्या आरेवाडा जंगलात ठोकल्या बेड्या

भूसुरुंग पेरणाऱ्या मट्टामीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, भामरागडच्या आरेवाडा जंगलात ठोकल्या बेड्या

 

गडचिरोली: अतिदुर्गम व नक्षलप्रभावित भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ जमिनीत भूसुरुंग पेरुन जवानांचा घातपात करण्याचा कट १६ नोव्हेंबरला झाला होता. पोलिसांनी मोठ्या तत्परतेने माओवाद्यांचा  हा डाव उधळून लावला होता. दरम्यान, यातील एका आरोपीला २४ नोव्हेंबरला पोलिसांनी भामरागडच्या आरेवाडा जंगलातून अटक केली. पांडु कोमटी मट्टामी (३५, रा. पोयारकोटी ता. भामरागड) असे त्या आरोपीचे नाव आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिसंवेदनशील व माओवादग्रस्त गडचिरोलीत सुरक्षा यंत्रण अलर्ट मोडवर होती. अशातच मतदानाच्या चार दिवस आधी १६ नोव्हेंबरला भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलालगत  ताडगावला जोडणाऱ्­या मार्गावर स्फोटके जमिनीत पुरुन ठेवण्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी हेलिकॉप्टरने बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सी- ६० जवान व राज्य राखीव दलाच्या जवानांना तेथे पाठवले.   शोध घेऊन पुरुन ठेवलेली स्फोटके घटनास्थळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आले. एक क्लोमर व दोन स्फोटकांचा समावेश होता.  त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्रे व दारुगोळा लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी   भामरागड ठाण्यात भारतीय दंड संहितका कलम १०९, १३२, १२६ (२), १९० , १९१ (२) (३), ६१ (२) सह कलम भारतीय हत्यार कायदा कलम ४, ५ भारतीय स्फोटके कायदा तसेच देशविघातक कृती केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता.  या प्रकरणात पांडु मट्टामी याचे नाव समोर आले होते. तो भामरागड तालुक्यातील आरेवाडा जंगलात असल्याची माहिती मिळाल्यावरुन उपनिरीक्षक संकेत नानोटी यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.    पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अहेरीचे अपर अधीक्षक श्रेणीक लोढा, भामरागडचे उपअधीक्षक अमर मोहिते, भामरागडचे पो.नि. दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.  

अभूतपूर्व शांततेत निवडणूक प्रक्रिया
दरम्यान, लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक देखील शांततेत पार पाडण्यात पोलिस यंत्रणेला यश आले. विधानसभेसाठी जिल्ह्यात तब्बल १६ हजार जवानांचा फौजफाटा तैनात होता. कोठेही अनुचित घटना घडली नाही. छत्तीसगड व तेलंगणा सीमावर्ती भागात पोलिसांनी राबविलेल्या नक्षलविरोधी अभियानासह हेलिकॉप्टर मुव्हमेंट तसेच अत्याधुनिक १३० ड्रोन कॅमेरे व यंत्रसामुग्री तसेच ७०० किलोमीटर रोड ओपनिंग या नियोजनामुळे नक्षल्यांचे मनसुबे उधळून लावण्यात पोलिस यशस्वी झाले.
 

Web Title: Landmine planting Mattami arrested, shackled in Bhamragarh's Arewada forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.