आरमोरी तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने माेर्चात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:39 AM2021-02-09T04:39:40+5:302021-02-09T04:39:40+5:30
आरमोरी : ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करणे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला जाणार आहे. या ...
आरमोरी : ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करणे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला जाणार आहे. या माेर्चात आरमाेरी तालुक्यातील हजाराे ओबीसी बांधव सहभागी होणार, असा निर्धार ओबीसी बांधवांच्या सर्वपक्षीय सहविचार सभेत करण्यात आला.
प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभागृहात सर्वपक्षीय सहविचार सभा साेमवारी पार पडली. या सभेत मोर्चाच्या प्रवासाचे नियोजन मोर्चाचा प्रचार-प्रसार या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक खेडेगावात ओबीसी आरक्षण आणि ओबीसी जनगणना संदर्भात जाणीव-जागृती करण्याच्या दृष्टीने दररोज ते पाच ते सहा गावात जाणे. ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत हाेण्याच्या दृष्टिकोनातून दरराेज सकाळ व सायंकाळी जाणीव-जागृती करणे. प्रत्येक गावातील ओबीसी बांधवांनी कोणताही पक्ष भेद न करता किंवा राजकीय उद्देश न साधता सगळ्यांनी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सहकार्य करावे आणि ओबीसी महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बैठकीत मान्यवरांनी केले. ओबीसी प्रवर्गातून ग्रामपंचायतीवर निवडून आलेले प्रवीण ठेंगरी, मनोज पांचलवार आणि चेतन भोयर या तीन युवकांचा स्वागत व सत्कार बैठकीत करण्यात आला. सहविचार सभेत ओबीसी नेते धनपाल मिसार, पंकज खरवडे, मिलिंद खोब्रागडे, नंदू नाकतोडे, दौलत धोटे, चेतन भोयर, निखिल धार्मिक, राजेंद्र मस्के, पुरुषोत्तम ठाकरे, मिथुन शेबे, किशोर ठाकरे, प्रवीण ठेंगरी, विलास चिलबुले, रुपेश गजपुरे, मनीष राऊत, मनोज पांचलवार, पिलारे, जितेंद्र ठाकरे, गुलाब मने, संजय ठाकरे, श्रीधर कुथे उपस्थित होते.