विकासाच्या नियोजनात शेवटच्या घटकाला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:30 PM2018-04-08T23:30:30+5:302018-04-08T23:30:30+5:30
भाजप शासन सत्तेत आल्यापासून वीज, रस्ता, सिंचन, शिक्षण, पाणी, गॅस, शौचालय आदी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : भाजप शासन सत्तेत आल्यापासून वीज, रस्ता, सिंचन, शिक्षण, पाणी, गॅस, शौचालय आदी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचले आहेत. नियोजन करताना तळागाळातील नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
चामोर्शी तालुक्यातील कुरूड येथे १६ गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बांधली जाणार आहे. या योजनेचे भूमीपूजन रविवारी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते, सहउद्घाटक जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, पं.स. सभापती आनंद भांडेकर, जि.प. सदस्य रमेश बारसागडे, डॉ. भारत खटी, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, पं.स. सदस्य उषा सातपुते, रेखा नरोटे, माजी पं.स. सभापती केशव भांडेकर, मधुकर भांडेकर, रघुनाथ भांडेकर, कार्यकारी अभियंता संजय वाघ, उपविभागीय अभियंता रत्ना बिष्णोई, सरपंच वनिता मेश्राम, वनिता वासेकर, भाविका देवतळे, जयश्री दुधबळे, भारती किरमे, उपसरपंच रमेश सातपुते, लालाजी भोयर, शालू सातपुते, उदयसिंग भिरबंशी, रमेश गव्हारे, सचिव विशाल चिळे, साईनाथ बुरांडे, बाबुराव शेंडे, पोलीस पाटील यामिनी भोयर उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी तत्पर असून विकासासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. स्वच्छ भारत अभियानात चामोर्शी तालुका मागे असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात खासदार अशोक नेते यांनी सबका विकास या ब्रिदवाक्यानुसार १०० दिवसात १०० योजनांच्या माध्यमातून सामान्यांचा विकास करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. आमदार डॉ. देवराव होळी यांनी अनेक प्रलंबित योजना भाजपा सरकारच्या काळात मार्गी लागल्या आहेत, असे मार्गदर्शन केले.
संचालन पुरूषोत्तम गायकवाड, प्रास्ताविक कार्यकारी अभियंता संजय वाघ तर आभार गुणवंत शेंडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी वीर शिवाजी कला क्रीडा मंडळ व कुरूड येथील नागरिकांनी सहकार्य केले.
नळ योजनेत या गावांचा आहे समावेश
कुरूड प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये १६ गावे समाविष्ट आहेत. यामध्ये कुरूड, नाचनगाव, रामपूर, रामपूर टोला, आमगाव, विसापूर, खोळदा, हिरवगाव, जान्हाळा, आमगाव, आमगाव चक नंबर १, रेखेगाव, अनंतपूर, वालसरा, राजनगट्टा, भिवापूर, कुंभारवाही या गावांना पाणी पुरवठा होणार आहे. ८ कोटी ६४ लाख रूपये एकूण खर्च सदर योजनेवर केला जाणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या कमी होण्यास मदत होईल.