बंधाºयांमुळे शेवटच्या शेताला पाणी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:15 AM2017-10-29T00:15:02+5:302017-10-29T00:15:36+5:30
दिना नदी प्रकल्पाच्या भेंडाळा ते चाकलपेठ दरम्यानच्या कालव्यावर शेतकºयांनी ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लखमापूर बोरी : दिना नदी प्रकल्पाच्या भेंडाळा ते चाकलपेठ दरम्यानच्या कालव्यावर शेतकºयांनी ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविले आहे. त्यामुळे शेवट असलेल्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्यास अडचण निर्माण होत आहे. सिंचन विभागाने सदर बंधारे ुफोडून शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवावे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.
भेंडाळा परिसरातील बहुतांश शेतीला दिना सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या माध्यमातून सिंचन उपलब्ध होते. सदर पाणी लखमापूर बोरीपर्यंत पोहोचते. यावर्षी दिना प्रकल्पात कमी जलसाठा आहे. मध्यंतरी १० दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. धान निसवण्याच्या मार्गावर असताना पाणी बंद झाल्याने धानपीक करपायला लागले होते. शेतकºयांनी ओरड सुरू केल्यानंतर पाणी सोडण्यात आले. मागील सहा दिवसांपासून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र भेंडाळा ते चाकलपेठ मायनरवर अनेक ठिकाणी शेतकºयांनी बंधारे बांधून पाणी अडविले आहे.
परिणामी शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्यास अडचण निर्माण होत आहे. कालव्यावर बंधारा बांधणे अवैध असले तरी सिंचन विभागाचे कर्मचारी संबंधित शेतकºयांवर कोणतीच कारवाई करीत नसल्याने दिवसेंदिवस बंधारे बांधण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धान पिकाला एका पाण्याची गरज आहे. मात्र पाणी मिळत नसल्याने धान पीक करपण्याची शक्यता आहे. पाण्यावरून शेतकºयांमध्ये भांडण होत आहेत. बंधारे बांधणाºया शेतकºयांवर कारवाई करणे आवश्यक असतानाही सिंचन विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सदर बंधारे फोडून शेवटच्या शेतकºयाला पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी लखमापूर बोरी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.