आष्टीत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:26 AM2020-12-27T04:26:54+5:302020-12-27T04:26:54+5:30
आष्टी : आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय घोट अंतर्गत अड्याळ व मार्कंडा(कं) येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत आष्टी ...
आष्टी : आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय घोट अंतर्गत अड्याळ व मार्कंडा(कं) येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत आष्टी येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ डॉ. प्रभाकर पंदिलवार यांच्या हस्ते करण्यात आला. धानाला हमीभाव घोषित केला असला तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १२ क्विंटल ऐवजी एकरी ९.६० क्विंटल धान खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट शासकीय गोदामात आणून विक्री करावे, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक दादाजी कोटलावार यांनी केले. परंतु एकरी कमी धान खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांसमाेर अडचण आहे. त्यामुळे एकरी २० क्विंटल धान खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी उपप्रादेशिक व्यवस्थापक नानाजी आंबटकर, संचालक पी.टी. दडमल,व्ही.ए.बुर्ले, अमोल इंगळे, संजय पंदिलवार उपस्थित होते.