वनहक्कधारकांसाठी सिंचन विहीर याेजना सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:36 AM2021-03-05T04:36:03+5:302021-03-05T04:36:03+5:30

गडचिराेली : जिल्ह्यात अनेक अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे देण्यात आले आहेत. परंतु, या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची ...

Launch Irrigation Well Scheme for Forest Rights | वनहक्कधारकांसाठी सिंचन विहीर याेजना सुरू करा

वनहक्कधारकांसाठी सिंचन विहीर याेजना सुरू करा

Next

गडचिराेली : जिल्ह्यात अनेक अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे देण्यात आले आहेत. परंतु, या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा देण्यासाठी विशेष सिंचन विहीर याेजना सुरू करावी, अशी मागणी हाेत आहे. बहुतांश अतिक्रमित शेती ही जंगलाला लागून आहे. त्यामुळे या भागात नाले अथवा नद्यांचा अभाव आहे.

पावसाच्या पाण्यावरच शेतकरी शेती करतात. अनियमित पाऊस व अन्य कारणांमुळे शेतातील पीक अंतिम टप्प्यात करपते. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाताे. त्यामुळे वनहक्कधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरींची गरज आहे. मागेल त्याला शेततळे तसेच धडक सिंचन विहीर या धर्तीवर वनहक्कधारकांसाठी सिंचन विहीर याेजना सुरू केल्यास संपूर्ण शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल. जिल्ह्यातील अनेक शेतकरी सिंचनाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु त्यांना अद्यापही विहीर अथवा अन्य साधनांचा लाभ मिळाला नाही. गडचिराेली जिल्हा दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. शासनाच्या याेजना पाेहाेचण्यास अडचणी येत आहेत. याशिवाय नागरिकांना याेजनांची माहिती मिळत नसल्याने त्यांचा विकास रखडला आहे. शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे शासनाने शेतकरीहिताच्या याेजना राबविण्याची गरज आहे. दरवर्षी अनेक शेतकरी वनहक्काची मागणी करतात. परंतु, त्यांच्या मागणीला गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Web Title: Launch Irrigation Well Scheme for Forest Rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.