धानाेरा येथे मका खरेदी केंद्राचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:24 AM2021-06-19T04:24:39+5:302021-06-19T04:24:39+5:30
उद्घाटन कार्यक्रमाला तहसीलदार सी. जी. पित्तुलवार, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, नायब तहसीलदार दामोदर भगत, उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चाैधरी, ...
उद्घाटन कार्यक्रमाला तहसीलदार सी. जी. पित्तुलवार, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, नायब तहसीलदार दामोदर भगत, उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चाैधरी, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ साळवे, सारंग साळवे, संजय कुंडू व शेतकरी उपस्थित होते.
मे महिन्यातच मक्याची मळणी झाली. तेव्हापासूनच शेतकरी आधारभूत मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करीत हाेते. परंतु शासनस्तरावरून दिरंगाई झाली. अखेर शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले व मका खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. धानाेरा तालुक्यातील मुरुमगाव व कारवाफा येथेही मका खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहे; परंतु तेथे गाेदामाची व्यवस्था नसल्याने धानोरा येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मका विक्रीस आणताना चालू हंगामाचा पीक पेरा असलेला सात-बारा उतारा मूळ प्रत, आधार कार्ड, बँक पासबुकची छायांकित प्रत व मोबाईल क्रमांक आणणे आवश्यक आहे, असे केंद्राच्या वतीने कळविण्यात आले.