कुरखेडात ‘पाेलीस दादालोरा खिडकी’चा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:25 AM2021-06-11T04:25:22+5:302021-06-11T04:25:22+5:30
जिल्हा पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, मनीष कलवानिया यांच्या संकल्पनेतून ग्रामीण जनतेला विविध शासकीय योजनेचा ...
जिल्हा पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, मनीष कलवानिया यांच्या संकल्पनेतून ग्रामीण जनतेला विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुका तसेच जिल्हा मुख्यालयात हेलपाटे मारावे लागतात. यावेळी त्यांचा अधिकचा वेळ वाया जाऊन आर्थिक बोजा सहन करावा लागतो. एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांचा लाभ व प्रमाणपत्रांकरिता अर्ज करण्याची सुविधा निर्माण होण्याचा दृष्टीने पोलीस दादालोरा खिडकी ही संकल्पना जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध पोलीस स्टेशन स्तरावर राबविण्यात येत आहे. यानिमित्त पोलीस व ग्रामीण जनतेत आत्मीयतेचे संबंधसुद्धा वृद्धिंगत होणार आहेत. कुरखेडा येथील पोलीस दादालोरा खिडकीच्या उद्घाटनप्रसंगी ठाणेदार सुधाकर देडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल माने, पोलीस हवालदार उमेश नेवारे, मीनाक्षी तोडासे, गौरीशंकर भैसार, ललीत जांभुळकर, बाबूराव उराडे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील जनतेने पोलीस विभागाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘एक खिडकी’ उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यांनी केले.
===Photopath===
100621\img-20210604-wa0044.jpg
===Caption===
कूरखेडा पोलीस दादालोरा खिडकीचे उदघाटन