तलाव खोलीकरण कामांचा शुभारंभ
By admin | Published: May 31, 2017 02:21 AM2017-05-31T02:21:22+5:302017-05-31T02:21:22+5:30
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत देसाईगंज, आरमोरी, कोरची तालुक्यात तलाव खोलीकरणाच्या कामांना सुरुवात झाली आहे.
देसाईगंज व आरमोरी तालुक्यात कामे : आमदार व भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत देसाईगंज, आरमोरी, कोरची तालुक्यात तलाव खोलीकरणाच्या कामांना सुरुवात झाली आहे. या कामांचा आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
देसाईगंज तालुक्यातील धानोरा येथील सिंचाई विभागाअंतर्गत येणाऱ्या तलाव खोलीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामांचा शुभारंभ आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे, सरपंच योगेश नाकतोडे, उपसरपंच निकम, सचिव पेशने यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरची तालुक्यातील सातपुती येथे वन विभागाच्या मार्फतीने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सिमेंट प्लग बंधारा निर्मितीचे काम सुरू झाले आहे. या कामाच्या शुभारंभाप्रसंगी आ. कृष्णा गजबे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव आनंद चौबे, गजभिये, सदाराम नरोटी, रामू नरोटी, गढवे, रामसू काटेंगे, व्ही. जी. भोये, महादेव बन्सोड, गांगरेड्डीवार आदी उपस्थित होते. सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन आ. कृष्णा गजबे यांनी कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना दिले.