चामाेर्शी तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:23 AM2021-07-09T04:23:49+5:302021-07-09T04:23:49+5:30
चामोर्शी तालुक्यात धान व कापूस ही पिके घेतली जातात. पीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपाची ...
चामोर्शी तालुक्यात धान व कापूस ही पिके घेतली जातात. पीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपाची आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा अधिसूचित खरीप हंगामातील पिकांसाठी २ टक्के नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. या योजनेची अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत आहे. विहीत मुदतीपूर्वी नजीकच्या बॅंकेत किंवा आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह जमा करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पीक विमा योजनेच्या शुभारंभप्रंसगी मंडल कृषी अधिकारी नेहा फरांदे, कृषी सहाय्यक विमा प्रतिनिधी चंद्रशेखर शेरखी, मंडल कृषी अधिकारी सुधाकर गजभिये, कृषी सहाय्यक वासुदेव होडबे, सुनील रनमले, उमेश उडाण, गणेश चापडे, सुधीर पेंदाम, शेतकरी विनायक पेंदाम, धनराज वासेकर व तालुक्यातील इतर शेतकरी उपस्थित होते.
080721\img-20210707-wa0183.jpg
शुभारंभ फोटो