प्राेजेक्ट कृषी समृद्धी याेजनेची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:36 AM2021-04-10T04:36:28+5:302021-04-10T04:36:28+5:30

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाेलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील लिखित शेवगा लागवड पुस्तिकेचे विमाेचन पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ...

Launch of Project Agriculture Prosperity Scheme | प्राेजेक्ट कृषी समृद्धी याेजनेची सुरुवात

प्राेजेक्ट कृषी समृद्धी याेजनेची सुरुवात

Next

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाेलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील लिखित शेवगा लागवड पुस्तिकेचे विमाेचन पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शेवगा शेती संबंधित मार्गदर्शनात्मक चित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर पाेलीस अधीक्षक गाेयल यांच्या हस्ते शेतकऱ्यांना शेवगा राेपट्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात १५ हजार राेपटे वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी शहीद स्मृतिस्थळ एक खिडकी याेजनेचे उद्घाटन पाेलीस अधीक्षक गाेयल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला अपर पाेलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अहेरीचे अपर पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे, उपविभागीय पाेलीस अधिकारी राहुल गायकवाड, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सहायक पाेलीस निरीक्षक महादेव सेलार, पीएसआय पंकज सबकाळे, धनंजय पाटील, सरपंच किरण नैताम, आलदंडी येथील शेवगा शेंगा उत्पादक शेतकरी वारलु नैताम उपस्थित हाेते.

यशस्वीतेसाठी पेरमिली उपपाेलीस ठाण्यातील पाेलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

बाॅक्स....

आर्थिक उन्नती साधा : अंकित गाेयल

गडचिराेली जिल्ह्यात शेतकरी पारंपरिक पिकाशिवाय इतर उत्पादन घेताना दिसून येत नाहीत. शेती हे केवळ उपजीविकेचे साधन न राहता आर्थिक उत्पन्न वाढीचे स्रोत व्हावे, यासाठी शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धतीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण घ्यावे. तसेच कृषी विभागाकडून माेफत बी-बियाणे व राेपट्यांचा लाभ घ्यावा. कृषी उपक्रमाअंतर्गत प्रायाेगिक तत्त्वावर जिल्हाभरातील हाेतकरू व गरजू शेतकऱ्यांना माेफत शेवगा राेपट्यांचे वाटप पुन्हा केले जाईल. या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत हाेईल. तसेच शेवगा शेंगा व झाडाची पाने पाैष्टिकतेच्या दृष्टीने समृद्ध आहेत. शेवगा लागवड व विक्रीतून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी केले.

Web Title: Launch of Project Agriculture Prosperity Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.