अहेरीत शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:42 AM2021-07-14T04:42:18+5:302021-07-14T04:42:18+5:30

यावेळी सहसंपर्कप्रमुख विलास कोडाप यांनीही मार्गदर्शन केले. शिवसंपर्क अभियान हे राज्यव्यापी असून, नागरिक व गावकऱ्यांच्या समस्या, अडी-अडचणी, प्रश्न जाणून ...

Launch of Shiv Sampark Abhiyan in Aheri | अहेरीत शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ

अहेरीत शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ

Next

यावेळी सहसंपर्कप्रमुख विलास कोडाप यांनीही मार्गदर्शन केले. शिवसंपर्क अभियान हे राज्यव्यापी असून, नागरिक व गावकऱ्यांच्या समस्या, अडी-अडचणी, प्रश्न जाणून घेऊन त्याचा आराखडा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवून प्रश्न व समस्या निकाली लावण्याची ही संधी आहे. शिवसैनिकांनी व नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

प्रास्ताविक उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे यांनी, तर संचालन सुभाष घुटे यांनी केले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर बघमारे, रामशाही मडावी, अहेरी विधानसभा संघटक बिरजू गेडाम, सिरोंचा तालुकाप्रमुख अमित तिपट्टीवार, मूलचेरा तालुकाप्रमुख गौरव बाला, ग्रामीण तालुकाप्रमुख काशिनाथ कन्नाके, भामरागड तालुकाप्रमुख खुशाल मडावी, अहेरी उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल येरणे, अहेरी शहरप्रमुख महेश मोहुर्ले, दिलीप सुरपाम, सज्जू पठाण, दुर्गेश तोकला, उज्वल तिवारी, दीपक बिश्वास, निलकमल मंडल, संजय मंडल, इंदूताई गायकवाड, प्रेमीला मडावी, रसिका कोरेत, लक्ष्मीताई गोमासे, राजेश गुंतीवार, रूपेश नुकूम, शिवकुमार स्वामी, विलास पोचमपल्लीवार व शिवसैनिक उपस्थित होते.

(बॉक्स)

गावे कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करा

अहेरी येथून सिरोंचा, मूलचेरा, एटापल्ली, भामरागड तालुक्याच्या शिवसंपर्क अभियान गाड्यांना रवाना करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी कोरोनाचा काळ व कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असल्याने प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. शिवसंपर्क अभियान हे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतील असल्याने प्रत्येक शिवसैनिकाने या अभियानात सहभागी होऊन ते यशस्वी करण्याचे आवाहन केले.

Web Title: Launch of Shiv Sampark Abhiyan in Aheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.