सेविकांसाठी दुचाकी वाहन कर्ज याेजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:29 AM2020-12-25T04:29:02+5:302020-12-25T04:29:02+5:30
जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात कर्तव्य बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसला अनेकदा तालुका तसेच जिल्हा मुख्यालयात बैठकांकरिता यावे लागते. ...
जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात कर्तव्य बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसला अनेकदा तालुका तसेच जिल्हा मुख्यालयात बैठकांकरिता यावे लागते. आधीच दळणवळणाच्या साधनांचा अभाव असल्याने कर्मचाऱ्यांना सायकलीने प्रवास करावा लागताे. पावसाळ्यात तर अनेक अडचणी येतात. ही समस्या जाणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी दुचाकी वाहन कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार व सीईओ सतीश आयलवार यांच्या मार्गदर्शनात याेजनेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयातील विस्तार अधिकारी व्ही.एस.बुरीवार, लेखा विभागाचे व्यवस्थापक संजय अलमपटलावार, पर्यवेक्षक हेमलता कन्नाके, व्यवस्थापक चंदू मुक्कावार, रवींद्र भांडे उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्ज विभागाचे व्यवस्थापक राजू साेरते तर आभार निरीक्षक नंदकिशाेर नागताेडे यांनी मानले.
फाेटाे...
प्रस्ताव पत्र वितरण प्रसंगी उपस्थित व्ही.एस.बुरीवार, संजय अलमपटलावार, साेरते.