लगाम प्राथमिक आराेग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:06 AM2021-03-13T05:06:34+5:302021-03-13T05:06:34+5:30
मुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरूवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. डॉ. संतोष ...
मुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरूवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. डॉ. संतोष गेडाम यांच्या हस्ते फित कापून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. संतोष गेडाम यांनी तालुक्यात पहिली लस घेणारे ज्येष्ठ नागरिक इंदरशाह कडते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आरोग्यसेविका कांता कोंड्रावार, शब्दा गेडाम, व्हिक्टोरिया दुर्गे, आरोग्य सहाय्यक तारेश मेश्राम, आरोग्यसेवक व्यंकटेश मडीमुडिगेला, रामदास बढे, गट प्रवर्तक हेमा मोहुर्ले, मोहन रामगिरवार उपस्थित होते. ६० वर्षांवरील व ४५ ते ५९ वर्षांपर्यंतच्या मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तिंनी प्राथमिक आराेग्य केंद्रात मंगळवार, बुधवार व गुरूवार यादिवशी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आधारकार्ड व मोबाईल क्रमांकाच्या माहितीसह काेराेना प्रतिबंधात्मक लसीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.