तीन कोटींच्या कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:12 AM2018-12-19T00:12:03+5:302018-12-19T00:12:56+5:30

भारतीय जनता युवा मोर्चा मुलचेराद्वारा आयोजित तालुक्यातील खुदिरामपल्ली येथील नवनिर्मित क्रीडांगण येथे सीएम चषक स्पर्धेेचे उद्घाटन आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते १४ डिसेंबर २०१८ रोजी झाले.

Launch of works of three crores | तीन कोटींच्या कामांचा शुभारंभ

तीन कोटींच्या कामांचा शुभारंभ

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांची उपस्थिती : सीएम चषक स्पर्धेचेही उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : भारतीय जनता युवा मोर्चा मुलचेराद्वारा आयोजित तालुक्यातील खुदिरामपल्ली येथील नवनिर्मित क्रीडांगण येथे सीएम चषक स्पर्धेेचे उद्घाटन आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते १४ डिसेंबर २०१८ रोजी झाले.
यावेळी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती माधुरी उरेते, अहेरी न. पं. अध्यक्ष हर्षा ठाकरे, भाजपचे जिल्हा सचिव सुभाष गणपती, तालुका महामंत्री निखिल हलदार, तालुका उपाध्यक्ष गणेश बक्कावार, पंचायत समितीचे उप सभापती बासु मजूमदार, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष विजय बिस्वास, उत्तम शर्मा, मुलचेरा नगर पंचायतीचे गटनेते दिलीप आत्राम उपस्थित होते.
या ठिकाणी क्रिकेट, कॅरम व दौड स्पर्धा होणार आहेत. पालकमंत्री आत्राम यांनी बॅटने काही फटके मारल्यामुळे उपस्थित खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला.
यावेळी पालकमंत्री आत्राम म्हणाले, तरुणांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी भाजयुमोच्या वतीने राज्यभर अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या कलागुणांना पाहिजे त्या प्रमाणात वाव मिळत नाही. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी सहभाग नोंदवावा व जिल्ह्यासोबतच राज्यपातळीवर आपले प्राविण्य दाखवावे असे ते म्हणाले.
दरम्यान पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मुलचेरा ते देशबंधुग्राम, मुलचेरा ते अंबेला आणि विश्वनाथनगर ते कोडसापूर येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत अंदाजे ३ कोटी रुपयाच्या रस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
प्रास्ताविक सीएम चषक अहेरी विधानसभा संयोजक अमोल गुडेल्लीवार ह्यांनी केले तर आभार सीएम चषक विजय बिस्वास यांनी मानले. यावेळी शहरातील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Launch of works of three crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.