नेते लोकच नक्षल्यांना दारूगोळा पुरवतात, शहीदपुत्राच्या मातेचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 08:42 PM2019-05-02T20:42:29+5:302019-05-02T20:43:29+5:30

नेते लोकंच नक्षल्यांना भडकावतात, त्यांना दारूगोळा देतात. नक्षलवाद्यांना राजकीय नेतेच स्फोटके पुरवतात.

Leaders provide ammunition to the Maoists, severe charges by mother of gadchiroli death of the son of a martyr | नेते लोकच नक्षल्यांना दारूगोळा पुरवतात, शहीदपुत्राच्या मातेचा गंभीर आरोप

नेते लोकच नक्षल्यांना दारूगोळा पुरवतात, शहीदपुत्राच्या मातेचा गंभीर आरोप

googlenewsNext

भंडारा - गडचिरोली येथे झालेल्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेले दयानंद सहारे यांचे पार्थिव लाखांदूर तालुक्यातील दीघोरी येथील घरी दाखल झाले. विशेषे म्हणजे आजच दयानंद यांचा जन्मदिवस आहे. जन्मदिनीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. नक्षलवाद्यांकडे स्फोटके कुठून येतात, नेत्यांकडूनच त्यांना स्फोटके पुरविले जातात. असा गंभीर आरोप शहीद दयानंदच्या आईने केला आहे. 

नेते लोकंच नक्षल्यांना भडकावतात, त्यांना दारूगोळा देतात. नक्षलवाद्यांना राजकीय नेतेच स्फोटके पुरवतात. त्यामुळेच आमच्या मुलांचे जीव जातो, असे दयानंद शहारे यांच्या आईने म्हटले आहे. आपल्या शहीद पुलाच्या पार्थिवाची वाट बघत असता माध्यमांना प्रतिक्रिया देताना वीरमातेच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. लाखांदूर तालुक्यातील दिघोरी येथील दयानंद शहारे हे 2011 मध्ये गडचिरोलीमध्ये पोलीस म्हणून रुजू झाले होते. ते लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या आईने त्यांना मजुरी करून शिकविले आहे. तर दयानंद यांनी स्वतःही मजुरी करत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, साडेतीन वर्षाची एक मुलगी आणि 12 महिन्यांची मुलगी आहे. दुर्दैवी घटना म्हणजे दयानंद शहारे यांचा आज जन्मदिवस आहे. आजच त्यांच्या कुटुंबाला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. नक्षलांच्या भ्याड हल्ल्यात भंडारा जिल्ह्यातील तीन मित्रांना वीरमरण आले आहे. त्यामुळे जवानांच्या मृत्यूचा बदला घ्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील ग्रामस्थांनी केली आहे. 

दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील तीन जवानांना वीरमरण आले आहे.  वीरमरण आलेल्या तिन्ही जवान एकमेकांचे चांगले मित्र होते. तसेच कुटुंबातील कर्ते व्यक्ती होते. दिघोरी येथील दयानंद शहरे आणि कुंभली येथील नितीन घोरमारे हे कुंटुंबामध्ये एकटेच आहेत. तर लाखनी येथील भुपेश वालोदे यांच्या भावाला पक्षघात झाल्याने भुपेश यांच्यावरही संपूर्ण कुटुंबाची जवाबदारी होती.
 

Web Title: Leaders provide ammunition to the Maoists, severe charges by mother of gadchiroli death of the son of a martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.