अनुभवातून अन्य भाषा शिकाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:48 AM2018-02-08T00:48:54+5:302018-02-08T00:49:34+5:30

विज्ञान, गणित हे विषय प्रात्यक्षिकेतून शिकण्याचे विषय आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अध्ययनासाठी इंग्रजीचे महत्त्व अधिक असून विद्यार्थ्यांनी इंग्रजी वाचनाची सवय अंगिकारावी, तसेच मातृभाषेशिवाय इतर भाषा अनुभवाने शिकाव्या, असे प्रतिपादन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

Learn other languages ​​from experience | अनुभवातून अन्य भाषा शिकाव्या

अनुभवातून अन्य भाषा शिकाव्या

Next
ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रतिपादन : डीआयईसीपीडी मध्ये जिल्हास्तरीय परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विज्ञान, गणित हे विषय प्रात्यक्षिकेतून शिकण्याचे विषय आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अध्ययनासाठी इंग्रजीचे महत्त्व अधिक असून विद्यार्थ्यांनी इंग्रजी वाचनाची सवय अंगिकारावी, तसेच मातृभाषेशिवाय इतर भाषा अनुभवाने शिकाव्या, असे प्रतिपादन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
जिल्हा शैक्षणिक सातत्त्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था तथा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जि. प. गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी, गणित व विज्ञान विषयाचा जिल्हास्तरीय परिसंवाद जि. प. हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ओमप्रकाश गुढे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी भिलकर, डॉ. विवेक राऊत, शंकर दिग्देतुल्लवार, पुंडलिक कविराज, संजय भांडारकर, संजय नार्लावार, अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, पांडुरंग चव्हाण, मिलींद अघोर उपस्थित होते.
प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी सिंपोसिअम उपक्रमाचे महत्त्व तसेच वर्षभरात विषयनिहाय आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाची परिणामकारकता पाहणे, राबविण्यात आलेले नवोपक्रम, संबोध, संकल्पना व अनुभव यावर चर्चा घडवून आणणे, विद्यार्थ्यांच्या संपादणुकीमध्ये वाढ करून त्याचे सार्वत्रिकीकरण करणे यासह विविध बाबींवर मार्गदर्शन केले. परिसंवादात इंग्रजी विषयाचे १२०, गणिताचे ९० शिक्षक सहभागी झाले. सादरीकरणानंतर प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्यांना गौरविण्यात आले. संचालन कुणाल कोवे, रहिम पटेल तर आभार प्रदीप पाटील यांनी मानले. डॉ. विजय रामटेके, संजय बिडवाईकर, विठ्ठल होंडे, गुरूराज मेंढे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Learn other languages ​​from experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.