अध्यापनात शिकणे तत्त्व अंगिकारा
By Admin | Published: August 2, 2015 01:39 AM2015-08-02T01:39:47+5:302015-08-02T01:39:47+5:30
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ ची अंमलबजावणी करताना प्रत्येक शिक्षकाने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मसुद्याची सुरूवात...
विजय बन्सोड यांचे प्रतिपादन : कोंढाळा येथे केंद्र संमेलन
देसाईगंज : प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ ची अंमलबजावणी करताना प्रत्येक शिक्षकाने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मसुद्याची सुरूवात असणाऱ्या कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘संस्कृती आणि प्रगती’ या निबंधाचा मथितार्थ लक्षात घेऊन शिकण्यासाठी शिकणे हे तत्त्व अंगिकारावे, ज्ञानरचनावादाचा स्वीकार करून अध्यापन करावे, असे आवाहन केंद्रप्रमुख विजय बन्सोड यांनी केले.
विद्या निकेतन लोकमान्य टिळक शैक्षणिक संकूल कोंढाळा येथे कुरूड केंद्राच्या पहिल्या केंद्र संमेलनात बन्सोड बोलत होते. उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक देवराव भोसकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून अनिल मुलकलवार, देवेंद्र नाकाडे, नीलकंठ चावरे, मधुकर राऊत, ओमप्रकाश लेनगुरे, होमाबाई शहारे, वैशाली खोब्रागडे उपस्थित होत्या.
केंद्रसंमेलनात ८२ शिक्षक सहभागी झाले होते. संचालन ए. आर. इंगोले तर आभार निर्वास मेश्राम यांनी मानले. कुंबलवार, व्ही. जी. शेंडे, संजीवनी परतेकी, भारती कुमरे, रिना कन्नाके यांनी सहकार्य केले.