देसाईगंजात सुपरफास्ट ट्रेनचे थांबे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:55 PM2019-01-17T23:55:02+5:302019-01-17T23:55:33+5:30

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनील सिंग सोहेल यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे सल्लागार समितीची बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीत देसाईगंज येथे दरभंगा एक्स्प्रेससह इतर सुपरफास्ट ट्रेनचे थांबे देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

Leave the Superfast train in Desaiganj | देसाईगंजात सुपरफास्ट ट्रेनचे थांबे द्या

देसाईगंजात सुपरफास्ट ट्रेनचे थांबे द्या

Next
ठळक मुद्देरेल्वेच्या जीएमची भेट : रेल्वे सल्लागार समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनील सिंग सोहेल यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे सल्लागार समितीची बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीत देसाईगंज येथे दरभंगा एक्स्प्रेससह इतर सुपरफास्ट ट्रेनचे थांबे देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
दरभंगा एक्सप्रेसला केवळ गोंदिया व बल्लारशाह येथे थांबा देण्यात आला आहे. या दोन शहरामंध्ये २५० किमीचे अंतर आहे. मात्र यादरम्यान एकाही ठिकाणी थांबा नाही. देसाईगंज येथे या एक्सप्रेसचा थांबा देण्यात यावा. यशवंतपूर-कोरबा वैनगंगा एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस चालवावी. गोंदिया-बल्लारशाह एक्सप्रेसमध्ये आरक्षित डब्बे सुरू करावे. या रेल्वेमध्ये डब्ब्यांची संख्या वाढवावी, रेल्वे स्टेशनवर बनविलेल्या फूट ओव्हर ब्रिजचा विस्तार करून आरमोरी मार्ग ते ब्रह्मपुरी मार्गापर्यंत केला जावा.
बाजाराच्या दिशेने रेल्वे मार्गावर गेटची निर्मिती करावी, सुपरफास्ट ट्रेन देसाईगंज येथे किमान दोन मिनीटासाठी थांबविण्यात याव्या, प्लॅटफार्मवर वेटिंग हॉलची निर्मिती करावी, प्लॅटफार्म २ चा विस्ता करावा, ब्रह्मपुरी बायपास मार्गाची रेल्वे क्रॉसिंगची रूंदी वाढवावी, रेल्वे स्टेशनकडील जुना रस्ता सुरू करावा, कॅन्टिगची व्यवस्था करावी, वृद्ध व दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष व्यवस्था उपलब्ध करावी, प्लॅटफार्म क्र.३ वर सुलभशौचालय बांधावे, स्टेशनवर नियमित तिकीट तपासणी व जीआरपीएफची पोस्टिंग करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.
या निवेदनावर नगराध्यक्ष शालू दंडवते, जितेंद्र परसवानी, ऋषी शेबे, चक्रधर टिकले, इम्रान खान, सॅम्युअल जॉन, पी.डी.रामटेके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पाण्याची सुविधा उपलब्ध करा
देसाईगंज येथील प्लॉटफार्म क्र. १, २ व ३ वर शुद्ध पाण्याची व्यवस्था उपलब्ध करावी, प्लॉटफार्म क्र.२ व ३ वर शौचालय बांधावे, जुन्या फुट ओव्हर ब्रिजवर विस्तार प्लॉटफार्म क्र.३ कडे करावा, दरभंगा एक्सप्रेसचा थांबा द्यावा, लाखांदूर ते देसाईगंजला येणाऱ्या ३३ केव्ही लाईनचे प्रमाणपत्र द्यावे, रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, अशी मागणी आ.कृष्णा गजबे यांनी जनरल मॅनेजर यांच्याकडे केली आहे.

Web Title: Leave the Superfast train in Desaiganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.