बाबूजींचा वारसा ‘लोकमत’ चालवत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 10:07 PM2018-11-25T22:07:34+5:302018-11-25T22:08:00+5:30

राज्य मंत्रिमंडळात असताना जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींचे काम मी जवळून पाहीले. राजकारणात एकनिष्ठ राहताना त्यांनी लोकमतच्या रूपाने सुरू केलेले समाजकार्यही अजोड आहे. केवळ व्यवसाय म्हणून नाही तर अनेक सामाजिक उपक्रमात लोकमतचे योगदान असते.

The legacy of Babuji is running 'Lokmat' | बाबूजींचा वारसा ‘लोकमत’ चालवत आहे

बाबूजींचा वारसा ‘लोकमत’ चालवत आहे

Next
ठळक मुद्देमारोतराव कोवासे : स्वातंत्र्य सेनानी, माजी मंत्री जवाहरलालजी दर्डांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य मंत्रिमंडळात असताना जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींचे काम मी जवळून पाहीले. राजकारणात एकनिष्ठ राहताना त्यांनी लोकमतच्या रूपाने सुरू केलेले समाजकार्यही अजोड आहे. केवळ व्यवसाय म्हणून नाही तर अनेक सामाजिक उपक्रमात लोकमतचे योगदान असते. बाबूजींच्या कार्याचा वारसा आजही त्यांचे चिरंजीव विजय आणि राजेंद्र दर्डा तसेच लोकमत परिवार चालवत आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार मारोतराव कोवासे यांनी काढले.
लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसेनानी आणि माजी मंत्री जवाहरलालजी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी लोकमत जिल्हा कार्यालयात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सुरूवातीला बाबूजींच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून पुष्पांजली वाहण्यात आली. त्यानंतर दोन मिनीट मौन श्रद्धांजली झाली. यावेळी नगरसेवक सतीश विधाते, सामाजिक कार्यकर्ते विनायक बोरकर, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, लोकमत समाचारचे सुनील चौरसिया, सखी मंच संयोजिका रश्मी आखाडे, तसेच लोकमतचे दिगांबर जवादे, दिलीप दहेलकर, गोपाल लाजुरकर, विकास चौधरी, विवेक कारेमोरे, निखिल जरुरकर, निलेश धाईत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: The legacy of Babuji is running 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.