विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:17 AM2018-02-24T01:17:31+5:302018-02-24T01:17:31+5:30
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली व कृषी महाविद्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता कायदेविषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली व कृषी महाविद्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता कायदेविषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) बी.एम.पाटील होते. होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक अधीष्ठाता डॉ.एस.बी. अमरशेटट्टीवार, वर्षा मनवर, डब्ल्यू.एम. खान आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्य न्याय दंडाधिकारी बी.एम. पाटील यांनी आपल्या भाषणातून शेतीविषयी असलेले कायदे, नियम, विविध अभिलेख याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने विविध योजनांची माहिती व पुरविण्यात येणाºया सेवांची माहिती दिली. डॉ. अमरशेट्टीवार यांनी मार्गदर्शन करताना कृषी विषयक नवीन तंत्रज्ञान कसे वापरता येईल, तसेच नवीन शेतीलागवड पद्धतीचा वापर करून शेतीचा विकास कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कृषीविषयक शिक्षण घेऊन प्राप्त ज्ञानाचा वापर कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी करावा, भारतामध्ये शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करीत नाही. परिणामी दर एकरी किंवा हेक्टरी मिळणारे उत्पादन इतर देशांच्या तुलनेने अतिशय कमी आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करावा, यासाठी कृषी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कृषीविषयक असलेल्या विविध कायद्यांचा अभ्यास करावा, शिक्षणाने मानवाचा सर्वांगिण विकास होतोे, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. आनंद टिगरे तर आभार डॉ. विजय काळपांडे यांनी केले.