लोकसभेच्या मताधिक्याने आमदारांची डोकेदुखी वाढली

By admin | Published: May 24, 2014 11:34 PM2014-05-24T23:34:04+5:302014-05-24T23:34:04+5:30

गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी, आरमोरी या तिनही विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवाराला मताधिक्य मिळालेले नाहीत. उलट उमेदवार ज्या गडचिरोली

Legislative assembly resulted in increased headaches of the legislators | लोकसभेच्या मताधिक्याने आमदारांची डोकेदुखी वाढली

लोकसभेच्या मताधिक्याने आमदारांची डोकेदुखी वाढली

Next

अभिनय खोपडे - गडचिरोली

गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी, आरमोरी या तिनही विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवाराला मताधिक्य मिळालेले नाहीत. उलट उमेदवार ज्या गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत, त्या मतदार संघातही ६९ हजारांचा फटका काँग्रेसला बसला आहे. आरमोरी क्षेत्रातही ४२ हजारांवर तर अहेरी क्षेत्रात ४३ हजारांवर मतांचा फटका काँग्रेसला बसला आहे. आजवरचा जिल्ह्याचा इतिहास पाहता, मतदारांनी लोकसभेला दिलेला कौल विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार विधानसभेसाठी मैदानात उतरावे की नाही, याविषयी अत्यंत चिंताग्रस्त आहे.

सध्या यंदाच्या निवडणुकीतील मतांच्या आकड्यांनी काँग्रेस निपचित पडली आहे. दोन महिन्यात कसे होणार याची चिंता आमदारांना आहे. अहेरीच्या अपक्ष आमदारालाही चिंता राहणारच आहे.

लोकमतने १९९0 पासूनच्या लोकसभा निवडणुकींच्या मतांचा आढावा घेतला. या आढाव्यात लोकसभेचा कौलच विधानसभेला कायम राहत आला, असे दिसून आले. कधी वर्षाच्या अंतराने विधानसभा पहिले तर लोकसभा नंतर अशा निवडणूका झाल्या. तरीही मतदारांनी आपला कौल हा अबाधितच ठेवल्याचे दिसून येते. कोणत्या निवडणुकीत प्रभावी उमेदवार रिंगणात आल्यास १0 ते १५ हजारापर्यंत मतदान काँग्रेसला वाढले, असेही दिसून आले. २00४ हे वर्ष सलग निवडणुकांचे होते. तत्कालिन चिमूर क्षेत्रात काँग्रेसचा उमेदवार पंजा चिन्हावर नव्हता. त्यामुळे विधानसभेचे मताधिक्यात वाढ झाल्याचे दिसते. तसेच गडचिरोली व सिरोंचा विधानसभा मतदार संघात बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र वैद्य यांनीही मोठे मताधिक्य लोकसभेत घेतले होते. त्याचा फरक या काँग्रेसच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या मतधिक्यावर पडला. विधानसभेला काँग्रेसने तुळशिराम पाटील पोरेटी यांच्यासारखे प्रभावी व नवा उमेदवार पक्षाने दिला होता. त्यामुळे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला आघाडी दिसते, ही या मागचे प्रमुख कारणे आहे, असे राजकीय जाणकार मानतात.२00९ मध्ये म्हणजेच लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या मताधिक्यात १३ हजार ७00 मतांचा फरक आहे. विधानसेला काँग्रेसची मते गडचिरोली विधानसभा क्षेत्रात वाढली. मात्र काँग्रेसचा केवळ मात्र ९६0 मतांनी विजयी झाली. या चार ते पाच निवडणुकांचे मताधिक्य व मतदारांचा बदलणारा कौल पाहता, २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रात बसलेला फटका लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्षासाठी फार चांगली परिस्थिती राहण्याची शक्यता दिसत नाही. १0 ते १५ हजार मतांचे आकडे मागे-पुढे होऊ शकतात. परंतु ३0 हजाराच्या वरील मतांचे अंतर कापणे हे कठीण जाणारी बाब आहे, असे राजकीय अभ्यासकही मानतात.

Web Title: Legislative assembly resulted in increased headaches of the legislators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.