धानोरात कायदेविषयक मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:04 AM2018-03-15T01:04:32+5:302018-03-15T01:04:39+5:30
तालुका विधी सेवा समिती धानोराच्या वतीने मंगळवारी दुपारी २ वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय धानोरा येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
धानोरा : तालुका विधी सेवा समिती धानोराच्या वतीने मंगळवारी दुपारी २ वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय धानोरा येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी नि.प्र. वासाडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अधीवक्ता टी.के. गुंडावार, यू.आर. बारब्धे, सरकारी अधीवक्ता बी.एन. मेश्राम उपस्थित होते. कायदेविषयक शिबिरादरम्यान उपस्थित मान्यवरांनी मानवी तस्करी व व्यावसायिक क्षेत्रात होणारे लैंगिक शोषण याबाबत मार्गदर्शन केले.
महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोेषण होत असल्यास याबाबतची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये केल्यास पोलीस विभाग जातीने लक्ष घालून प्रकरणाचा तपास करते. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी शोषण होत असल्यास याबाबतची तक्रार करावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन राजू गोवर्धन तर उपस्थितांचे आभार वरिष्ठ लिपीक नंदकिशोर सरडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचाºयांनी सहकार्य केले. धानोरा तालुका विधी सेवा समितीच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले जात असल्याने कायदेविषयक जनजागृती होण्यास मदत होत आहे.