रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात अडकला पट्टेदार वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 08:49 PM2021-11-30T20:49:39+5:302021-11-30T20:50:06+5:30

Gadchiroli News जंगलात रानडुकराची शिकार करण्यासाठी काही लोकांनी लावून ठेवलेल्या सापळ्यात चक्क एक पट्टेदार वाघ अडकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला.

A leopard caught in a trap set for hunting wild boar | रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात अडकला पट्टेदार वाघ

रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात अडकला पट्टेदार वाघ

Next
ठळक मुद्देबेशुद्ध करून मुक्तता करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न

 

गडचिरोली : जंगलात रानडुकराची शिकार करण्यासाठी काही लोकांनी लावून ठेवलेल्या सापळ्यात चक्क एक पट्टेदार वाघ अडकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला. ही बाब वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच त्या वाघाची सापळ्यातून मुक्तता करण्यासाठी नागझिरा आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून शार्प शुटरला पाचारण करण्यात आले आहे. कुरखेडा या तालुका मुख्यालयापासून ३० किलोमीटरवर मालेवाडाजवळच्या कातलवाडा गावानजीकच्या जंगलात हा प्रकार घडला आहे. परिसरातील जंगलात रानडुकराची शिकार करून त्याची अवैधपणे विक्री करण्याचा प्रकार अधूनमधून सुरू असतो. त्यासाठी वनकर्मचाऱ्यांची नजर चुकवून शिकारीसाठी सापळे लावले जातात. मात्र यावेळी पहिल्यांदाच त्या सापळ्यात एक वाघ अडकल्याचे लक्षात आहे. ही माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

देसाईगंज वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान, त्या वाघाला सापळ्यातून मुक्त करण्यासाठी बेशुद्ध करणे आवश्यक असल्याचे लक्षात येताच वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देणाऱ्या शार्प शुटरला पाचारण केले.

वाघाची सापळ्यातून सुटका करण्यासाठी त्याला आधी बेशुद्ध करणे गरजेचे आहे. त्यामुळे नागझिरा आणि ताडोबा येथील शार्प शुटरला बोलावले आहे. ते पोहोचल्यानंतर रात्रीच त्याला बेशुद्ध करून सापळ्यातून मुक्त केले जाईल.

- डॉ. किशोर मानकर

वनसंरक्षक, गडचिरोली

Web Title: A leopard caught in a trap set for hunting wild boar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.