गडचिरोली जिल्ह्यातील मौसम येथे पट्टेदार वाघाची शिकार; नाल्यात पुरून ठेवले प्रेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 07:17 PM2021-12-30T19:17:43+5:302021-12-30T19:18:08+5:30

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील मौसम या गावाजवळ पट्टेदार वाघाची शिकार करण्यात येऊन त्याचे शव नाल्यात पुरल्याची घटना उघड झाली आहे.

Leopard hunting at Mausam in Gadchiroli district; The corpse was buried in the nala | गडचिरोली जिल्ह्यातील मौसम येथे पट्टेदार वाघाची शिकार; नाल्यात पुरून ठेवले प्रेत 

गडचिरोली जिल्ह्यातील मौसम येथे पट्टेदार वाघाची शिकार; नाल्यात पुरून ठेवले प्रेत 

Next

गडचिरोली: आलापल्ली सिरोंचा मुख्य मार्गावरील मौसम गावाच्या 100मीटर आधी रस्त्याच्या उजव्या बाजूला मुख्य रस्त्यापासून तीनशे मीटर अंतरावर कक्ष क्रमांक 615, मौसम बिट, इंदाराम राउंड, अहेरी रेंज,  येथे अकरा केवी विद्युत लाईनवरून बाइंडिंग ताराच्या साह्याने विद्युत प्रवाह येऊन शिकार केल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

एम एस ई बी च्या नोंदीनुसार सात ते आठ दिवस आधी अकरा केवी विद्युत लाईन ट्रीप झाल्याची नोंद आहे.  सदर वाघाची शिकार ही सांबर,  चित्तर, रानडुक्कर तथा अन्य वन्यजीवांसाठी झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण बहुदा या क्षेत्रात वाघाचा वावर असल्याने वाघाचा स्पर्श त्या जिवंत तारेला झाला असावा त्यामुळे ही शिकार झाली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सदर वाघाचे प्रेत हे खाजगी शेतालगत नाल्यात पुरून ठेवले होते. जंगलात गस्तीवर असताना वनरक्षक एन एम परचाके, अतुल कतलामी, वनपाल नरेंद्र वडेट्टीवार यांना निदर्शनास आले त्यांनी सदर घटनेबाबत तात्काळ वरिष्ठांना कळविले. मृतक वाघ हा पूर्ण वयस्कर पट्टेवाला मादी वाघ असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत वाघाचे शरीर एवढे सुजले होते की त्या वाघाचे नखे आणि मुंडकी गायब आहे असे दिसून पडत होते. सदर वाघाच्या प्रेताची उत्तरीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी अहेरी, डॉक्टर उत्तरेश्वर नारायण सुरवसे यांनी उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अहेरी शिल्पा शीगोन यांच्या उपस्थितीत केले.
 

Web Title: Leopard hunting at Mausam in Gadchiroli district; The corpse was buried in the nala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ