शिवारात बिबट जखमी अवस्थेत आढळला

By admin | Published: November 12, 2014 10:43 PM2014-11-12T22:43:46+5:302014-11-12T22:43:46+5:30

तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असलेल्या नवरगावच्या झुडुपी जंगल शिवारात बिबट्या जखमी अवस्थेत आढळल्याची घटना आज बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

The leopard was found in a critical condition | शिवारात बिबट जखमी अवस्थेत आढळला

शिवारात बिबट जखमी अवस्थेत आढळला

Next

कोरची : तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असलेल्या नवरगावच्या झुडुपी जंगल शिवारात बिबट्या जखमी अवस्थेत आढळल्याची घटना आज बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची वार्ता कळताच नवरगाव परिसरातील नागरिकांनी जखमी बिबट्याला पाहण्यासाठी शिवाराकडे धाव घेतले.
जखमी अवस्थेत बिबट्या असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी मनोज गढवे, वनरक्षक झाडे, भोयर, पवार, क्षेत्रसहाय्यक शेंडे आदी घटनास्थळावर पोहोचले. यावेळी जखमी बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक साधन सामुग्रीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सकाळी ८ वाजतापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिवसभर प्रतीक्षा करावी लागली. वृत्त लिहिस्तोवर बिबट्याला पकडण्याचे साहित्य घटनास्थळी पोहोचले नव्हते. नवरगावच्या झुडुपी जंगल शिवारात असलेल्या जखमी बिबट्याला तातडीने पकडून औषधोपचार करणे आवश्यक आहे. मात्र वनविभागाच्या भोंगळ कारभारामुळे सायंकाळपर्यंत जखमी बिबट्याला पकडण्यात आले नव्हते. जखमी बिबट्याला पकडून औषधोपचार करण्यास विलंब झाल्यास जखमी बिबट्याचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वनविभागाशी संबंधीत अशीच घटना चामोर्शी शहरानजीक घडली. चामोर्शी शहरापासून अवघ्या ३ किमी अंतरावरील वैनगंगा नदीघाटालगत असलेल्या आमराई परिसरात १२ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास वाघीण मृतावस्थेत आढळून आली. चामोर्शी लगतच सदर घटना घडल्याने वाघिणीला पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी उसळली होती.
बुधवारी सकाळी काही शेतकरी आमराई परिसरात आपल्या शेतीवर गेले असता, आमराई परिसरात वाघीण मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी सदर हकीकत नागरिकांना सांगितली व लगेचच सदर घटनेची माहिती चामोर्शीचे वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार यांना फोनवरून देण्यात आली. मृत वाघिणीचा पोटाखालील भाग पाण्याने भिजलेला असल्याचा घटनास्थळी आढळून आला. त्यामुळे वाघिण वैनगंगा नदीच्या पात्रातील पाण्यातून आली असावी, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The leopard was found in a critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.