येत्या सत्रापासून संगणक शिक्षणाचे धडे

By Admin | Published: June 14, 2014 02:18 AM2014-06-14T02:18:47+5:302014-06-14T02:18:47+5:30

धानोरा व कुरखेडा या दुर्गम आदिवासी बहूल तालुक्यातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे धडे मिळावे,...

Lessons of computer education from the coming session | येत्या सत्रापासून संगणक शिक्षणाचे धडे

येत्या सत्रापासून संगणक शिक्षणाचे धडे

googlenewsNext

दिलीप दहेलकर गडचिरोली
धानोरा व कुरखेडा या दुर्गम आदिवासी बहूल तालुक्यातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे धडे मिळावे, यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत

ई-विद्या प्रकल्प २०१० मध्ये सुरू करण्यात आला. मात्र निधी अभावी दुसऱ्या वर्षी २०११-१२ या सत्रात सदर प्रकल्प बंद होता. मात्र आता शासनाने या प्रकल्पाला मंजुरी

प्रदान केली असून मानव विकास मिशन अंतर्गत २०१३-१४ या वर्षाकरीता १ कोटी २१ लक्ष रूपयाची तरतूद केली आहे. त्यामुळे येत्या सत्रापासून दुर्गम भागातील विद्यार्थी

संगणक शिक्षणाचे धडे गिरविणार आहेत.
शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संगणक माहिती व तंत्रज्ञान हा विषयी अत्यावश्यक करण्यात आला. यामुळे सर्वच

शाळातील इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी संगणकीय शिक्षण घेत आहे. प्रत्यक्ष संगणकही हाताळत आहे. मात्र प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षणाची

सुविधा नाही. शहरी भागातील प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी खासगी कॉम्युटर इंस्टीट्युटमध्ये प्रवेश घेऊन संगणक शिक्षण घेत आहे. मात्र गडचिरोली या मागास जिल्ह्यातील

विद्यार्थी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खासगी संस्थेत जाऊन संगणक शिक्षण घेऊ शकत नाही. या दुर्गम तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या संगणक शिक्षणाच्या

सोयीसाठी शासनाने गडचिरोली जिल्ह्यात ई-विद्या प्रकल्पाला मान्यता दिली.
या प्रकल्पांतर्गत धानोरा तालुक्यातील ८४ व कुरखेडा तालुक्यातील १०० अशा एकूण १८४ शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, स्क्रीन, व्ही. सॅट, प्रिंटर, स्पीकर व टेबल, खुर्ची

आदी साहित्यांचा पुरवठा करण्यात आला. २०१२-१३ या शैक्षणिक सत्रात शिक्षण विभागाच्या तपासणी अहवालानुसार एव्ही लॅबमधील इयत्ता १ ते ४ च्या शाळांमधील एकूण

९ हजार १७४ विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण घेतले.

Web Title: Lessons of computer education from the coming session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.