लिलावाकडे कंत्राटदारांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:56 PM2018-04-08T23:56:23+5:302018-04-09T00:06:11+5:30
भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे तेंदूपत्त्याचा लिलाव शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. मात्र एकही कंत्राटदार हजर झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाहेरी : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे तेंदूपत्त्याचा लिलाव शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. मात्र एकही कंत्राटदार हजर झाला नाही.
लिलावाच्या वेळी हेडरी, लाहेरी, मलमपेद्दूर या तीन गावातील ग्रामसभांची प्रतिनिधी उपस्थित होते. सकाळपासून १.३० वाजेपर्यंत गावकऱ्यांनी लिलावासाठी तेंदूपत्ता कंत्राटदाराची वाट बघितली. मात्र एकही कंत्राटदार आला नाही. त्यामुळे कंत्राटदारांमध्ये नाराजी दिसून आली. लिलावाच्या वेळी रामजी भांडेकर, मल्लमपेदूरचे ग्रामसेवक ए. डी. गोरे, पेसा समन्वयक ओ. पी. निकुरे, तालुका समन्वयक गव्हारे, लाहेरीचे सरपंच बोगामी, होडरीचे ग्रामसेवक मारबते, लाहेरीचे ग्रामसेवक डी. जे. मेश्राम, रोशन वड्डे, सुधाकर बोगामी उपस्थित होते. शुक्रवारी एकही कंत्राटदार हजर न झाल्याने १६ एप्रिल रोजी फेरलिलाव ठेवण्यात आला आहे. तेंदू लिलावाकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविल्याने तेंदूपत्ता व्यवसाय अडचणीत आला आहे.