ई-पीक पाहणी माेबाइल ॲपबाबत शेतकऱ्यांना धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:44 AM2021-09-09T04:44:37+5:302021-09-09T04:44:37+5:30
कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून तलाठी एस.एन. शिंपी, तसेच अतिथी म्हणून सरपंच अपर्णा राऊत, उपसरपंच गजानन सेलोटे, ग्रा.पं. सदस्य ...
कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून तलाठी एस.एन. शिंपी, तसेच अतिथी म्हणून सरपंच अपर्णा राऊत, उपसरपंच गजानन सेलोटे, ग्रा.पं. सदस्य नलिना वालदे व शेतकरी उपस्थित होते. तलाठी शिंपी यांनी गावातील शेतकऱ्यांना ई-पीक ॲपबद्दल माहिती देत, ॲप डाऊनलोड करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उभ्या पिकांची नोंद याद्वारे करावी, असे मार्गदर्शन केले. यासाठी शेताच्या बांधावर भेट देण्यात आली. याशिवाय ग्रामपंचायत सदस्य शेषराव नागमाेती यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना सायंकाळी एलईडीवर माहिती दिली.
बाॅक्स
अशी भरावी माहिती
ई-पीक पाहणी ॲपमध्ये धान पिकाची माहिती भरताना सर्वप्रथम खाते क्रमांक निवडावे, त्यानंतर भूमापन किंवा गटक्रमांक निवडावा. सुरू असलेला हंगाम निश्चित करून पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दाखवेल. त्यानंतर पिकाचा वर्ग, निर्भेळ पीक, निर्भेळ पिकाचा प्रकार, लागवड केलेले पीक निवडावे. किती क्षेत्रात पीक आहे, ते क्षेत्र नमूद करावे. जलसिंचनाचे साधन, सिंचन पद्धत, लागवडीचा दिनांक, मुख्य पिकाचे छायाचित्र शेतावर जाऊन काढून माहिती सबमिट करावी. त्यापूर्वी माहिती अचूक असल्याची खात्री करावी. अशा प्रकारेच तूर लागवड केली असल्यास पुन्हा वरीलप्रमाणे माहिती भरावी, परंतु तूर पीक अजल सिंचित दाखवावे.
070921\43522041-img-20210907-wa0004.jpg
माहिती देताना एस एन शिंपी तलाठी , उपस्थित सरपंच अपर्णा राऊत