दुधाळ जनावरांसाठी चारा व्यवस्थापन व पीक लागवडीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:08 AM2021-02-06T05:08:23+5:302021-02-06T05:08:23+5:30
आरमाेरी : माविम जिल्हा कार्यालय, आत्मा, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली आणि ज्ञानदीप लोक संचालित साधन ...
आरमाेरी : माविम जिल्हा कार्यालय, आत्मा, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली आणि ज्ञानदीप लोक संचालित साधन केंद्र आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने २ फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आरमोरी येथे दुधाळ जनावरांसाठी चारा व्यवस्थापन व चारा पीक लागवड या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयाेजित करण्यात आली. या कार्यशाळेत दुग्ध व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा दुग्धविकास व्यवसाय अधिकारी सचिन यादव हाेते. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. विक्रम कदम, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे, आत्माचे बीटीएम रहांगडाले, तालुका पशुधन विस्तार अधिकारी वैभव देशपांडे, जीवनज्योती लोक संचालित साधन केंद्र वैरागडच्या व्यवस्थापिका यामिनी मातेरे उपस्थित होत्या.
दुधाळ जनावरांसाठी चारा व्यवस्थापन व चारा पीक लागवड विषयावर विस्तृतपणे माहिती दिली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते चारा पीक लागवड करण्याकरिता बचत गटातील शेतकरी महिलांना व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिलांना तथा दूध वितरित करणाऱ्या महिलांना शेतीच्या बांधावर लागवडीसाठी तसेच घरी परसबागेत रिकाम्या जागेत लागवड करण्यासाठी दाेन हजार रोपे वितरित करण्यात आली. कार्यशाळेत ५ बचत गटातील ५० महिला उपस्थित होत्या.
कार्यशाळेचे प्रास्ताविक व्यवस्थापिका अल्का मेश्राम, संचालन समन्वयक सरिता सहारे तर आभार लेखापाल भास्कर खरकाटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी ज्योती खोब्रागडे, वर्षा रामटेके, कुंदा मेश्राम, निराशा लोणारे, मंदा बुटे आदींनी सहकार्य केले.
बाॅक्स .....