‘वनधन’च्या गटांना दस्तावेज सांभाळण्याचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:43 AM2021-09-14T04:43:07+5:302021-09-14T04:43:07+5:30
प्रशिक्षणात बिरसामुंडा वनधन गट, राणी दुर्गावती वनधन गट, लिंगोजिंगो वनधन गट, सुभाषचंद्र बोस वनधन गट, जय बुढालपेन वनधन गट, ...
प्रशिक्षणात बिरसामुंडा वनधन गट, राणी दुर्गावती वनधन गट, लिंगोजिंगो वनधन गट, सुभाषचंद्र बोस वनधन गट, जय बुढालपेन वनधन गट, जयसेवा गोंडवाना वनधन गट गहाणेगाटा, रमयी वनधन गट बेलगाव व जयसेवा वनधन गट हुळुकदुमा आदी १० गट व केंद्रांचे अध्यक्ष-सचिव तसेच कोषाध्यक्ष असे एकूण २३ व्यक्ती सहभागी झाले. साधन व्यक्ती म्हणून कुमारी जमकातन उपस्थित होत्या.
जमकातन यांनी गटाचे व्यवहार पारदर्शक, आत्मविश्वास पुरावा, गट मजबुतीसाठी आणि जबाबदारीने ऑडिट व्हावे, यासाठी रेकॉर्डची आवश्यकता असते. गट किंवा केंद्र चालविताना कोणकोणते रेकॉर्ड आवश्यक आहेत व त्यांचे महत्त्व, कॅशबुक, लेजरबुक, स्टाॅक बुक, व्हाऊचर बुक, खरेदी-विक्री रजिस्टर केंद्र याबाबत सविस्तर माहिती दिली, तसेच प्रात्यक्षिकातून माहिती दिली. उपस्थित सदस्यांना सविस्तर माहिती दिल्यानंतर यापुढे रेकॉर्ड लिहून आणले जाईल व पुढील प्रशिक्षणात ते तपासून देण्यात येईल, असे सांगण्यात आले. प्रशिक्षणाचे आभार विश्वनाथ हलामी यांनी मानले. यशस्वीतेसाठी तिलक उईके व रामलाल नुरुटी यांनी सहकार्य केले.