खादी कापड निर्मितीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 06:00 AM2020-01-17T06:00:00+5:302020-01-17T06:00:14+5:30
सध्या खादी वापरणे ही एक फॅशन झालेली आहे. हीच फॅशन महिला बचत गटाच्या व्यवसाय उभा करण्यात कशी फायद्याची आहे हे महिलांना समजावून सांगण्यात आले. त्यानंतर स्वत: गावातच हातमागावर आधारित कापड निर्मिती व्यवसाय तयार करणेचे ठरविण्यात आले. गावात सुरू असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची यासाठी मदत झाली. यामधून मशीन खरेदी व प्रशिक्षणसाठी लागणारा निधी रोजगार निर्मितीसाठी देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : तालुक्यातील चिरचाडी येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गावातील महिलांना खादी कापड निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिलांची स्वयंरोजगाराकडे वाटचाल सुरू झाली आहे.
गावातील महिलांना गावातच रोजगार मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत काम केले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्राम परिवर्तक ललित जामुनकर यांनी २ ते ८ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत दान उत्सव आयोजित केला. या उत्सवात महिला सक्षमीकरण व ग्रामोद्योग विषयाला अनुसरून महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
सध्या खादी वापरणे ही एक फॅशन झालेली आहे. हीच फॅशन महिला बचत गटाच्या व्यवसाय उभा करण्यात कशी फायद्याची आहे हे महिलांना समजावून सांगण्यात आले. त्यानंतर स्वत: गावातच हातमागावर आधारित कापड निर्मिती व्यवसाय तयार करणेचे ठरविण्यात आले. गावात सुरू असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची यासाठी मदत झाली. यामधून मशीन खरेदी व प्रशिक्षणसाठी लागणारा निधी रोजगार निर्मितीसाठी देण्यात आला. त्यातूनच एक खादी कापड निर्मिती व्यवसाय महिलांना कसा उपयोगाचा असेल याविषयी समजावून याचे प्रशिक्षण गावातच मिळण्याचे नियोजन करण्यात आले. १६ डिसेंबर २०१९ ते १४ जानेवारी या कालावधी चिरचाडी गावातील ३० महिलांना खादी कापड बनविण्याचे उत्तम प्रशिक्षण अभियानातून देण्यात आले.
खादी निर्मितीचा मोठा व्यवसाय उभारण्याचे नियोजन महिला करीत असून ग्राम परिवर्तन अभियानाची मदत महिलांच्या विकासासाठी होत असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले.