मुनघाटे महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:42 AM2021-08-13T04:42:00+5:302021-08-13T04:42:00+5:30

शिबिराचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे इंग्रजी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ सुधीर निकम यांचा हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ...

Lessons of personality development in Munghate College | मुनघाटे महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे

मुनघाटे महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे

Next

शिबिराचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे इंग्रजी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ सुधीर निकम यांचा हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे होते. समारोपीय कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित होते. शिबिरात गोंडवाना विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र देव, कवियत्री कुसुम आलाम, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्रा. पुणित मातकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, प्रा. अनिल धामोडे, डॉ. विजय रेवतकर सहभागी होत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. निकम यानी व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध पैलू स्पष्ट करताना वाचनातून घडलेले व्यक्तिमत्त्व व प्रत्यक्ष अनुभवातून घडलेले व्यक्तिमत्त्व यातील फरक स्पष्ट केला, तर डॉ. शैलेंद्र देव यानी विद्यापीठाद्वारे व्यक्तिमत्व विकासाकरिता चालविण्यात येणारे विविध उपक्रमाची माहिती दिली.

प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी व्यक्तिमत्त्व विकासाकरिता चांगले छंद जोपासण्याची गरज प्रतिपादित केली. कवयित्री कुसुम आलाम यानी आदिवासी समाजाचे संस्कार अंगिकारले, तर जीवन सुकर होईल, असे सांगितले. प्रा. पुनित मातकर यांनी व्यक्तिमत्त्व विकासाकरिता मूल्य शिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्तिमत्व विकासाकरिता राष्ट्रसंंतांच्या विचाराचे वाचन, चिंतन, मनन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. डॉ. विजय रेवतकर यांनी व्यक्तिमत्त्व विकासात संभाषण कौशल्याचे महत्त्व प्रतिपादित केले. समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रभारी कुलगुरू श्रीराम कावळे यांनी ज्ञानाचा विनिमय उत्तम व्यक्तिमत्त्वाचे लक्षण असल्याचे सांगत व्यक्तीचे वागणे बोलणे विचार करणे यातून व्यक्तिमत्त्व साकार होत असल्याचे सांगितले

प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे प्रा. डॉ. गणेश सातपुते यांनी केले. प्रमुख उपस्थितांचा परिचय डॉ. रवींद्र विखार, डॉ. राखी शंभरकर, डॉ. दीपक बन्सोड यांनी दिला. संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, तर आभार डॉ, संजय महाजन यांनी मानले.

Web Title: Lessons of personality development in Munghate College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.